तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्याच्या तोंडाला काळे फसणार नगरसेवक अँड विकास जोगदंड
बीड (प्रतिनिधी ) 26 सप्टेंबर प्रभाग क्र 4 नागोबा गल्ली, दुबे कॉलनी शास्त्री नगर सह आदी भागात नगर परिषद च्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत विकास प्रिय नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते व नालीचे कामे सुरु असून सदरील कामे या भागाचे नगरसेवक अँड विकास जोगदंड हे व्यक्तिशः उभे राहून पारदर्शकपणे करून घेत आहेत दुबे कॉलनी येथील रस्त्याचे खोद काम सुरु असतांना अमृतची पाणी पुरवठा करणारी वाहिका तुटल्याने गेल्या पंधरा दिवसापासून खंडेश्वरी, रमाई कॉलनी,दुबे कॉलनी,साई नगर, स्वरासंगम कॉलनी सह आदी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अभियंता व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या बाबत वारंवार विनंती करून देखील पाणीपुरवठा वाहिका जोडणी केली जात नाही प्रभाग क्र 4 हा भाग बहुजन समाजाचा असल्यानेच या कडे प्राधिकरणाचे अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत अमृत जल अभियान ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवल्यामुळे शहरातील कुठल्याही भागात पाणीपुरव...