तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्याच्या तोंडाला काळे फसणार नगरसेवक अँड विकास जोगदंड
बीड (प्रतिनिधी) 26 सप्टेंबर प्रभाग क्र 4 नागोबा गल्ली, दुबे कॉलनी शास्त्री नगर सह आदी भागात नगर परिषद च्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत विकास प्रिय नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते व नालीचे कामे सुरु असून सदरील कामे या भागाचे नगरसेवक अँड विकास जोगदंड हे व्यक्तिशः उभे राहून
पारदर्शकपणे करून घेत आहेत
दुबे कॉलनी येथील रस्त्याचे खोद काम सुरु असतांना अमृतची पाणी पुरवठा करणारी वाहिका तुटल्याने गेल्या पंधरा दिवसापासून खंडेश्वरी, रमाई कॉलनी,दुबे कॉलनी,साई नगर, स्वरासंगम कॉलनी सह आदी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अभियंता व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या बाबत वारंवार
विनंती करून देखील पाणीपुरवठा वाहिका जोडणी केली जात नाही प्रभाग क्र 4 हा भाग बहुजन समाजाचा असल्यानेच या कडे प्राधिकरणाचे अभियंता
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत अमृत जल अभियान ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवल्यामुळे शहरातील कुठल्याही भागात पाणीपुरवठा वाहिका नादुरुस्त झाल्यास दुरुस्त करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व त्यांनी नेमून दिलेल्या गुत्तेदाराची आहे परंतु भस्मासुराची कातडी पांगरलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांशी काही देणं घेणं नसून प्रभागातील
माय माऊल्यांना पाण्यासाठी
भटकंती करावी लागत आहे
हा आमच्या प्रभागावर घोर अन्याय असून दोन दिवसात पाणीपुरवठा वाहिका दुरुस्त केली नाही तर जनहितासाठी निगरगट्टा अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्याच्या तोंडाला काळे फसणार असा ईशारा भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी पत्रकातून दिला आहे
Comments
Post a Comment