तुलसी कॉलेज फ्रेशर डे पार्टी उत्साहात साजरी
कॅनरा बँक मॅनेजर सतीश कुमार यांच्या हस्ते फ्रेशर्स पार्टीचे उद्घाटन
बीड (प्रतिनिधी):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात बीसीए, बीसीएस, बीएससी कोर्स साठी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी चे आयोजन २१ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता तुलसी महाविद्यालय बीड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला कॅनरा बँक मॅनेजर सतीश कुमार यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अर्जुन राठोड, इंजिनीयर दिपंकर रोडे, प्रशासकीय अधिकारी सुदर्शन भालेराव, तुलसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल.एम.थोरात, उपप्राचार्य डी.जी. निकाळजे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शिल्पा बोराडे यांची उपस्थिती होती.
तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून आपल्या कलागुणांना वाव देत विविध प्रकारचे नृत्य सादर केली. तसेच गीत गायन करून मंत्रमुग्ध केले आणि मराठी चित्रपट सृष्टीतील नट दादा कोंडके, निळू फुले यांच्या आवाजात मिमिक्री करून उपस्थितांना हसवून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साधना आगलावे, कुमार प्रेम जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. विकास वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमास तुलसी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment