Posts

अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश येथे अपघातात एक जण गंभीर जखमी

Image
--- लिंबागणेश:- आज दि.२६ जुलै बुधवार रोजी दुपारी साडे बारा वाजता अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश बसस्थानक येथे कल्याण भास्कर गिरे वय ५० वर्षे हे दुचाकी वाहनाने ( एम एच २३ एक्यु ६७९७) घराकडुन बसस्टॅन्ड कडे जात असताना मांजरसुंभा येथून पाटोद्याकडे जाणा-या चारचाकी वाहनाने ( एम एच २६ एके ३०८१) धडक दिली असुन त्यात कल्याण गिरे हे अपघातात गंभीर जखमी झाले असुन पाय मोडल्याने त्याने बीड येथील रेणु रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असुन पुढील उपचारासाठी पुणे येथील संचेती रूग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नेकनुर पोलिस स्टेशनचे एपीआय विलास हजारे पुढील तपास करत आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी यांना बीड शहरासह जिल्हयातील विविध मागण्यासाठी मनसेचे निवेदन

Image
निवासी उपजिल्हाधिकारी यांना बीड शहरासह जिल्हयातील विविध मागण्यासाठी मनसेचे निवेदन  ३१ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्तारोको  आष्टी ( प़तीनिधी --गोरख मोरे ) : मा हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीप बापु धोत्रे, सरचिटनिस संतोष भाऊ नागरगोजे यांच्या सुचनेवरून मा निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना बीड शहरासह जिल्हातील विविध मागण्यासाठीचे निवोदन देण्यात आले.  बीड जिल्हातील अवैध धंदे तात्काळ बंद करा, बीड शहरातील बीड जालना रोडवर मध्येभागी दुभाजक तात्काळ करा, शहरातील सर्व सिग्नल तात्काळ चालू कारा, बीड शहरातील मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा, अनेक मागण्यासाठी दिनांक ३१ जुलै २०२३ सोमवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल यांचे निवोदन देण्यात आले .  या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा वर्षाताई जगदाळे, सहकार सेना जिल्हाध्यक्ष अशोक सुरवसे, तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण गायके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आशाताई कुठे, महिला आघाडी शहराध्यक्ष ...

परडी माटेगावचे आदर्श सरपंच अँड मधव शेंडगे यांच्यावर वाढदिवसा निमीत्त शुभेच्छांचा वर्षाव

Image
वडवणी प्रतिनिधी :    वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील युवा कर्तव्यदक्ष आदर्श सरपंच अँड माधव काका शेंडगे यांच्या वाढदिवसा निमित्त मित्रपरीवारांनी चाहत्यांनी त्यांचा हृदयी सत्कार केक कापुन व वॉटशॉप फेसबुक ट्युटर मोबाईल फोनद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटुन सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परडी माटेगाव येथील चिमुकल्यांनी वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला.     सविस्तर वृत्त असे की वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील युवा आदर्श सरपंच अँड माधव काका शेंडगे यांनी गावाचा विकास काय आसतो हे आपल्या सरपंच पदाच्या पाच वर्षाच्या कालखंडात माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळुंके व जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह भैय्या सोळंके यांच्या नेतृत्वाखाली गावात शासनाच्या विविध योजना आणुन गावचा सर्वांगिन विकास करत गावचा चेहरा मोहरा बदलला आहे.यामध्ये रस्ता,नाली,प्युअर ब्लॉक ३ वॉटर फिल्टर,शेत रस्ते,सार्वजनिक स्वच्छालय,संपुर्ण गावात घरोघरी नळ योजना, स्मशानभुमी,सभाग्रह,अंगणवाडी,सभामंडप...

शहरात होत असलेल्या रोड नाल्यांच्या निकृष्ट कामाची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार - अक्षय कोकाटे

Image
बीड प्रतिनिधी -बीड नगर पालिके अंतर्गत सध्या दलित बस्ती व नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून बीड शहरामध्ये विविध ठिकाणी सिताई कन्स्ट्रक्शन मार्फत कामे चालू आहेत. सदर कामे 1) बलभीम नगर व इदगाह ते नाळवंडी रोड मार्ग सारडा जिनिंग पर्यंत, संत सावतामाळी चौक ते फुलाई नगर सहयोग नगर व स्नेह नगर, नागोबा गल्ली मधील मातोश्री मंगल कार्यालय ते अंजिक्य चांदणे यांच्या घरापर्यंत व इतर ठिकाणी विविध कामे चालू असून बीड शहरामध्ये बहुतांशी कामे हैं सिताई कन्स्ट्रक्शन यांनी करत असल्याची खात्रीपूर्वक माहिती प्राप्त झालेली आहे. परंतू सदर कामे हे निकृष्ट दर्जाचे असून दर्जाहीन आहेत. सदरचे कन्स्ट्रक्शन खोदकाम न करता, सिलिंग न करता तसेच पी.सी.सी. न करता थेट थर टाकला जातो व त्याची इंच मनाला वाढेल तसे इंच घेताता व हे अधिकाऱ्यांशी संगणमत करून इन्सपेक्शन न घेऊ देता किंवा सॅम्पल न चेक करता होत आहेत. तसेच बोगस बील उचलण्यात येत आहे. सदर कामाच्या संदर्भात बहुतांश ठिकाणी लांबी रुंदी जास्त दाखवून त्या नियमानुसार कामे होत नाहीत. त्यामुळे बीड शहरातील जे रस्ता नालीचे काम चालू आहे. त्या विविध कन्स्ट्रक्शन वरती व सिताई ...

जिल्हा प्रशासनाने घेतली बातमीची दखल धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत पाडण्यास सुरुवात

Image
बीड (प्रतिनिधी) - शहरातील बुंदलपुरा भागात असलेली धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत कोसळण्याच्या स्थितीत आली होती. याची नोंद घेत मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी याविषयी प्रसिद्धी माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि बीड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना उद्देशून बातमी दिली होती. याची नोंद घेत जिल्हा प्रशासनाने धोकादायक स्थितीतील असलेली शाळेची भिंत पाडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सदरील शाळेपासून होणारा संभाव्य धोका टळला आहे. प्रशासन जागरूक आणि गतिमान असेल तर नागरिकांकडून आलेल्या सूचना किंवा तक्रारींवर कशाप्रकारे पटकन कामे केली जातात याचे उदाहरण या कार्यानिमित्ताने समाजासमोर आले आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हे कर्तव्यदक्ष व जनतेकडून आलेल्या सूचनांकडे लक्ष देणारे असतील तर आवश्यक असलेली कामे कशी पटकन होतात याचा अनुभव धोंडीपुरा शाळेच्या जीर्ण झालेल्या भिंतींना पाडण्याचे कार्य सुरू झाल्याने दिसून आले आहे. प्रचंड उंचीच्या असलेल्या शाळेच्या भिंती जेसीबी लावून पाडण्यास सुरुवात झाली असल्याने आता या भिंतींपासून होणारा संभाव्य धोका टळला आहे. याम...

इंटकच्या वतीने आगार प्रमुख संजय पुंडगे यांचा सत्कार

Image
बीड प्रतिनिधी - नव्याने रुजु झालेले आगार प्रमुख संजय पुंडगे यांचा इंटक संघटनेच्या वतीने बीड आगार येथे सत्कार बीड येथे रिक्त झालेल्या जागेत नव्याने रुजू झालेले बीड येथे आगार प्रमुख म्हणून संजय पुंडगे यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य परिवहन बीड महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स इंटक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी इंटक संघटनेचे प्रादेशिक सचिव बबन वडमारे किरण पठाडे, रमेश सुरवसे मंदाकिनी तांदळे, रत्नमाला खेत्रे जोशना मस्के, बबन कोरडे,प्रशांत वीर, प्रदीप सौदा तसेच या विभागातील ज्योती नागरगोजे ओ डब्लउ एस परजणे उपस्थित होते.

मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा: नसीम खान

Image
मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा: नसीम खान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नसीम खान यांची मागणी. मुंबई, दि. २५ जुलै काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्यक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.  मुस्लीम समाजाला देण्यात आलेले आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लीम समाजाला देण्यात आले होते. मा. उच्च न्यायालयानेही विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत सामिल करुन शैक्षणिक आरक्षण बहाल केले व नोकरीतील आरक्षण पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती. मागील ९ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे. मुस्लीम समाजात ५० घटक आहेत, याचा सर्वंकष विचार करुन मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना न्या...