शहरात होत असलेल्या रोड नाल्यांच्या निकृष्ट कामाची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार - अक्षय कोकाटे



बीड प्रतिनिधी -बीड नगर पालिके अंतर्गत सध्या दलित बस्ती व नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून बीड शहरामध्ये विविध ठिकाणी सिताई कन्स्ट्रक्शन मार्फत कामे चालू आहेत. सदर कामे 1) बलभीम नगर व इदगाह ते नाळवंडी रोड मार्ग सारडा जिनिंग पर्यंत, संत सावतामाळी चौक ते फुलाई नगर सहयोग नगर व स्नेह नगर, नागोबा गल्ली मधील मातोश्री मंगल कार्यालय ते अंजिक्य चांदणे यांच्या घरापर्यंत व इतर ठिकाणी विविध कामे चालू असून बीड शहरामध्ये बहुतांशी कामे हैं सिताई कन्स्ट्रक्शन यांनी करत असल्याची खात्रीपूर्वक माहिती प्राप्त झालेली आहे. परंतू सदर कामे हे निकृष्ट दर्जाचे असून दर्जाहीन आहेत. सदरचे कन्स्ट्रक्शन खोदकाम न करता, सिलिंग न करता तसेच पी.सी.सी. न करता थेट थर टाकला जातो व त्याची इंच मनाला वाढेल तसे इंच घेताता व हे अधिकाऱ्यांशी संगणमत करून इन्सपेक्शन न घेऊ देता किंवा सॅम्पल न चेक करता होत आहेत. तसेच बोगस बील उचलण्यात येत आहे. सदर कामाच्या संदर्भात बहुतांश ठिकाणी लांबी रुंदी जास्त दाखवून त्या नियमानुसार कामे होत नाहीत. त्यामुळे बीड शहरातील जे रस्ता नालीचे काम चालू आहे. त्या विविध कन्स्ट्रक्शन वरती व सिताई कन्स्ट्रक्शन वरती योग्य ती कार्यवाही होऊन कामा मध्ये सुधारणा आणणे गरजेचे आहे.जर संबंधीत कन्स्ट्रक्शन वर कार्यवाही झाली नाही तर मी निवेदक आज रोजी असे जाहीर करतो येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी बीड शहरातील सर्व कामांचा दर्जा योग्य रहावा व त्याचा सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून दिनांक 15.08.2023 रोजी न्यायीक व रितसर मार्गाने उपोषणास बसणार आहे. त्यामुळे वरील कन्स्ट्रक्शची योग्य ती चौकशी होऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावीत. करीता निवेदनातुन तक्रार रिपाईचे शहर संघटना सचिव अक्षय कोकाटे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी