अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश येथे अपघातात एक जण गंभीर जखमी
लिंबागणेश:- आज दि.२६ जुलै बुधवार रोजी दुपारी साडे बारा वाजता अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश बसस्थानक येथे कल्याण भास्कर गिरे वय ५० वर्षे हे दुचाकी वाहनाने ( एम एच २३ एक्यु ६७९७) घराकडुन बसस्टॅन्ड कडे जात असताना मांजरसुंभा येथून पाटोद्याकडे जाणा-या चारचाकी वाहनाने ( एम एच २६ एके ३०८१) धडक दिली असुन त्यात कल्याण गिरे हे अपघातात गंभीर जखमी झाले असुन पाय मोडल्याने त्याने बीड येथील रेणु रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असुन पुढील उपचारासाठी पुणे येथील संचेती रूग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नेकनुर पोलिस स्टेशनचे एपीआय विलास हजारे पुढील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment