Posts

आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांचे मुल पोलीस दलात निवड झाल्याबद्दल चिंचाळा येथील श्री. अशोक (आण्णा) पोकळे यांच्या वतीने आ.बाळासाहे आजबे यांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळा संपन्न.

Image
आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांचे मुल पोलीस दलात निवड झाल्याबद्दल चिंचाळा येथील श्री. अशोक (आण्णा) पोकळे यांच्या वतीने आ.बाळासाहे आजबे यांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळा संपन्न. आष्टी ( प़तीनिधी -गोरख मोरे ) :  आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील श्री. अशोक (आण्णा) पोकळे अध्यक्ष, विश्वास सेवाभावी संस्था, चिंचाळा चिंचाळा / राघापुर सरपंच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी बीड जिल्हा सरचिटणीस यांच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुल विविध जिल्ह्यांत नुकत्याच निकाल जाहीर झाल्येल्या पोलीस भरतीत उत्तम यश संपादन करून पोलिस शिपाई पदी निवड झाल्या बद्दल आष्टी तालुक्यातील सर्व यशस्वी पोलिस यांचा सत्कार समारंभ चिंचाळा येथे आयोजित करण्यात आला होता या सर्व नवयुक्त पोलीस यांचा आ.बाळासाहेब आजबे काका, डॉ.विलास सोनवणे, अशोक (आण्णा)पोकळे , संतोष कदम, अक्षय हळपावत,जि.प.सदस्य डोके महाराज, रत्नाकर चव्हाण सर, सकाहारी शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ चिंचाळा येथे संपन्न झाला .पोलिस भरतीत कठोर परिश्रम आणि मेहनत घेऊन जे यश प्राप्त केले त्या मेहनतीची दखल घेत दिनांक २७ मे २०२३ र...

जावयांचा पाहुणचार झाला असेल तर सा. बा. विभागाने अंबाजोगाई - गित्ता रोडवरील पुलाचे काम चालू करण्याच्या सूचना द्याव्या

अंबाजोगाई -: परळी मतदार संघाला जोडणारा अंबाजोगाई -गित्ता -जवळगाव रोडवरील पुलाचे काम पावसाळ्या पूर्वी होणे अपेक्षित होते मात्र अद्यापही या पुलाच्या कामास सुरवात झाली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई च्या जावयांचा पाहुणचार झाला असेल तर सा. बा. विभागाने अंबाजोगाई - गित्ता रोडवरील पुलाचे काम चालू करण्याच्या सूचना द्याव्या अशी म्हणण्याची वेळ नागरिकावर आली आहे. अंबाजोगाई गित्ता जवळगाव या मार्गांवर वाहतूक मोठया प्रमाणात असते.प्रामुख्याने परळी मतदार संघातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी साधारणतः तब्बल 2 कोटी 42 लाखाचा निधी मंजुर होऊन कित्येक महिने झाले. परंतु अद्याप या पुलाचे काम सुरूच झाले नाही.हा पूल शेवटची घटका मोजत आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते या वाहत्या पाण्यात अनेक दुर्दैवी घटना या पूर्वी घडल्या आहेत पुलावरून पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे परळी मतदार संघाला जोडणाऱ्या अनेक गावाचा संपर्क तूटतो.या पावसाळ्यात हा पूल वाहून जाण्याची शक्यता असल्याने या पुलाचे तात्काळ काम चालू करून पूर्ण गरजेचे आहे.अन्यथा पूल वाहून गेल्यास अनेक गावाचा ...

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी च्या 19 उच्च माध्यमिक विद्यालयांची बारावी निकालात यशाची परंपरा कायम

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी च्या 19 उच्च माध्यमिक विद्यालयांची बारावी निकालात यशाची परंपरा कायम  एकुण परिक्षास बसलेल्या २३६१ विद्यार्थी पैकी २१८१ विद्यार्थी उत्तीर्ण आष्टी ( प़तीनिधी -गोरख मोरे ) : आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्था अंतर्गत इयत्ता बारावीचा कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचा निकाल उत्कृष्ट लागला असून सर्व 19 कनिष्ठ महाविद्यालयांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे एकुण परिक्षास बसलेल्या २३६१ विद्यार्थी पैकी २१८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.नुकताच इयत्ता बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल जाहीर झाला प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विविध 19 कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा कायम जोपासली आहे.असून आष्टी येथील शेतकरी शिक्षण यामध्ये विविध कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे आहे अश्वलिंग कनिष्ठ महाविद्यालय पिंपळवंडी विज्ञान शाखा निकाल १०० टक्के, कला शाखा ९२ टक्के, पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी, कला शाखा ८७.७५ टक्के, विज्ञान शाखा ९८.९९ टक्के ,किमान कौशल्य ९६.६६ ...

मराठी पत्रकार परिषदेचा बीडमध्ये मराठवाडा विभागीय मेळावा

Image
बीड : मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा शाखा आणि परळी शाखेच्यावतीने 4 जून 2023 रोजी एम. आय.डी.सी.बीड येथील वैष्णवी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते तथा निर्भय बनो आंदोलनाचे नेते डॉ. विश्वंभर चौधरी, असिम सरोदे आणि परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे असतील.. सकाळी 9.30 वाजता मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येईल.. यावेळी माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठान च्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.पत्रकार भूषण पुरस्कार लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती, कृषी भूषण पुरस्कार कल्याण कुलकर्णी यांना तर समाज भूषण पुरस्कार मनिषाताई तोकले यांना जाहीर झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल.. यावेळी विश्वंभर चौधरी आणि असिम सरोदे यांचे "निर्भय बनो आंदोलनातील पत्रकारांची भूमिका" या विषयावर व्याख्यान होईल.. परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकारयांचा यावेळी सत्कार करण्यात येईल. दुपारच्या सत्रात असिम सरोदे *पत्रकार...

‘शासन आपल्या दारी’ अभियान एक क्रांतिकारी निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभसुमारे दीड लाख लाभार्थ्यांना ५ हजार ४५७ कोटींच्या निधीचे वाटप ‘ शासन आपल्या दारी’ अभियान एक क्रांतिकारी निर्णय  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  दि २६ सोयगाव /प्रतिनिधी यासीन बेग  सर्वसामान्य नागरिकांना थ योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे , कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, रमेश बोरनारे , उदय सिंग राजपूत, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी ...

पाटील आडनाव कोणाच्या बापाची जहागीर नाही-डॉ. जितीनदादा वंजारे

Image
          कितीतरी पाटील नावाचे उदगे समाजातील सगळ्यात गलिच्छ काम करणारे आहेत बलात्कारी ,दोन नंबर , खूण मारी,लुटारू,चोरी चपाटी करणारे आहेत त्यांना नाव बदलावायला लावणार काय ? बाया नाचवून नाचवून पाटीलकी बदनामी करणारे समाजातील पाटील आडनाव असणारी लोक स्वतःच नाव केंव्हा बदलणार? गौतमी पाटील ला आडनाव बदलायला सांगणाऱ्या हरामखोर लोकांना त्यांच्याच पाटलांनी बदनामी कारक घाण काम केल्याने त्यांना समाजातून बेदखल केंव्हा करतील? अख्खी पाटीलकी बायापाई घालवणारे स्री लंपट, वाड्यावर बोलावणारे स्री धार्जीन पाटल, स्रीपाई सगळी संपत्ती घालवणारे आत्ता भिकारी झालेले पाटल स्वतःची नाव केंव्हा बदलतील? त्यांना नाव बदलायला सांगा की त्यांनी केलेली बदनामी तुम्हाला मान्य असेल तर गौतमी ने केलेली गुपचूप मान्य करा.मनुवादी डोक्यात बुद्धी असेल तर समतावादी वागा नसता विषमतेचे विष पेरण्याचे वाली तुम्हीच असाल .लक्षात ठेवा स्वतातली घाण अगोदर बाहेर काढा.......! किरण माने सारखा सच्चा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीत आहे हे अभिमानास्पद आहे नसता नुसता मनुवादी बुरखा घातलेल्या लंपट लोकांनी हे क्षेत्र घाण केल...

संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचा 95.32 टक्के निकाल

Image
सोयगाव / प्रतिनिधि मुश्ताक शाह   सोयगाव :- येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचा 95.32 टक्के निकाल लागला आहे.यामध्ये विज्ञान शाखेत सोयगाव ची पूजा विजय काळे,,(७७.८० टक्के) गुण मिळवून प्रथम आली आहे यामध्ये कला शाखा 91 टक्के, विज्ञान शाखा 100 टक्के, वाणिज्य शाखा 95. 08 टक्के व एमसीव्हीसी 92 टक्के निकाल लागला आहे,दरम्यान सोयगाव च्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम-पूजा विजय काळे द्वितीय- वैभव दाभाडे(७६.६१ टक्के) तर तृतीय-पराग देशमुख(७६ टक्के) याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे निकाल जाहीर झाला आहे दैनिक बाळकडू चे पत्रकार विजय काळे यांची मुलगी पूजा काळे हिचा प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ उल्हास पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.     कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम घेतले.