शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी च्या 19 उच्च माध्यमिक विद्यालयांची बारावी निकालात यशाची परंपरा कायम

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी च्या 19 उच्च माध्यमिक विद्यालयांची बारावी निकालात यशाची परंपरा कायम 

एकुण परिक्षास बसलेल्या २३६१ विद्यार्थी पैकी २१८१ विद्यार्थी उत्तीर्ण

आष्टी ( प़तीनिधी -गोरख मोरे ) :

आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्था अंतर्गत इयत्ता बारावीचा कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचा निकाल उत्कृष्ट लागला असून सर्व 19 कनिष्ठ महाविद्यालयांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे एकुण परिक्षास बसलेल्या २३६१ विद्यार्थी पैकी २१८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.नुकताच इयत्ता बारावी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल जाहीर झाला प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत असलेल्या विविध 19 कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा कायम जोपासली आहे.असून आष्टी येथील शेतकरी शिक्षण यामध्ये विविध कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे आहे अश्वलिंग कनिष्ठ महाविद्यालय पिंपळवंडी विज्ञान शाखा निकाल १०० टक्के, कला शाखा ९२ टक्के, पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी, कला शाखा ८७.७५ टक्के, विज्ञान शाखा ९८.९९ टक्के ,किमान कौशल्य ९६.६६ टक्के,कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धानोरा विज्ञान शाखा ९६.६८ टक्के, कला शाखा ९३.६१ टक्के व वाणिज्य शाखा ९६.८७ टक्के, पिंपळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळा कला शाखा - ९६ टक्के, नागनाथ कनिष्ठ
महाविद्यालय नागतळा कला शाखा ९४. ५९ टक्के, महेश कनिष्ठ महाविद्यालय रुईनालकोल विज्ञान शाखा ९६.३४, कला शाखा ९० टक्के, भगवान उच्च माध्यमिक विद्यालय आष्टी कला शाखा - ८६ टक्के, विज्ञान शाखा ९५.५६ टक्के, वाणिज्य शाखा १०० टक्के, ज्ञानेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घाट कला शाखा ९३.३३ टक्के, श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कडा, कला शाखा ८७.६४ टक्के, विज्ञान शाखा ९७.५८ टक्के, वाणिज्य शाखा ८९.७४ टक्के व किमान कौशल्य शाखा ८२.६० टक्के, इंदिरा कन्या कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव कला शाखा ९२.३० टक्के, महिला कनिष्ठ महाविद्यालय पाटोदा विज्ञान शाखा ९५.१२ टक्के व कला शाखा ८५.७१ टक्के, श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय मातकुळी कला शाखा ९० टक्के, कला व विज्ञान महाविद्यालय अंमळनेर कला शाखा - ७८.७८ टक्के, विज्ञान शाखा - ९९.८६ टक्के, आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा कला शाखा- ७३.१७ टक्के व विज्ञान शाखा ८८. ६५ टक्के, विठ्ठल माध्यमिक व उच माध्यमिक विद्यालय निमगाव बोडखा कला शाखा ८७.१२ टक्के, जोगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय पारगाव जोगेश्वरी कला शाखा - ७६.९२ टक्के, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय पोखरी कला शाखा ७६.९२ टक्के, हनुमान माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरी घाटा कला शाखा ६६.६६ टक्के, निजाम पटेल कनिष्ठ महाविद्यालय मेहेकरी कला शाख ६६.६६ टक्के निकाल लागला आहे. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे गुण संपादन केले आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, युवा नेते अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ डी बी राऊत, प्रा. शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, संजय शेंडे ,सर्व प्राचार्य, प्राध्यापक व इतरांनी अभिनंदन केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी