आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांचे मुल पोलीस दलात निवड झाल्याबद्दल चिंचाळा येथील श्री. अशोक (आण्णा) पोकळे यांच्या वतीने आ.बाळासाहे आजबे यांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळा संपन्न.
आष्टी मतदार संघातील शेतकऱ्यांचे मुल पोलीस दलात निवड झाल्याबद्दल चिंचाळा येथील श्री. अशोक (आण्णा) पोकळे यांच्या वतीने आ.बाळासाहे आजबे यांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळा संपन्न.
आष्टी ( प़तीनिधी -गोरख मोरे ) :
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील श्री. अशोक (आण्णा) पोकळे अध्यक्ष, विश्वास सेवाभावी संस्था, चिंचाळा चिंचाळा / राघापुर सरपंच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी बीड जिल्हा सरचिटणीस यांच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुल विविध जिल्ह्यांत नुकत्याच निकाल जाहीर झाल्येल्या पोलीस भरतीत उत्तम यश संपादन करून पोलिस शिपाई पदी निवड झाल्या बद्दल आष्टी तालुक्यातील सर्व यशस्वी पोलिस यांचा सत्कार समारंभ चिंचाळा येथे आयोजित करण्यात आला होता या सर्व नवयुक्त पोलीस यांचा आ.बाळासाहेब आजबे काका, डॉ.विलास सोनवणे, अशोक (आण्णा)पोकळे , संतोष कदम, अक्षय हळपावत,जि.प.सदस्य डोके महाराज, रत्नाकर चव्हाण सर, सकाहारी शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ चिंचाळा येथे संपन्न झाला .पोलिस भरतीत कठोर परिश्रम आणि मेहनत घेऊन जे यश प्राप्त केले त्या मेहनतीची दखल घेत दिनांक २७ मे २०२३ रोजी सत्कार समारंभ आयोजित केला होता.
प्रथमतः पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ, सन्मान प्रमाणपत्र देऊन सर्व नवयुक्त पोलीस यांचा आई वडीला सह सन्मान केला , तसेच यावेळी मार्गदर्शन करतांना नुकतेच पोलीस दलात निवड झालेल्या बर्याच जनांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्याचे आई-वडील भावनिक होऊन डोळ्यातून आनंदाश्रू वाहून एक भावनिक वातावरण तयार झाले होते. भविष्यात अजून तालुक्यातील मुलांनी अभ्यास व मेहनत करून यश मिळवावे अशी संकल्पना आणि उद्दिष्ट ठेवून हा सत्कार सोहळा पार पाडला या सत्कार समारंभासाठी आष्टी मतदार संघातील सर्व पोलीस दलात निवड झालेले नवयुक्त पोलिस व चिंचाळा येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment