जावयांचा पाहुणचार झाला असेल तर सा. बा. विभागाने अंबाजोगाई - गित्ता रोडवरील पुलाचे काम चालू करण्याच्या सूचना द्याव्या
अंबाजोगाई -:
परळी मतदार संघाला जोडणारा अंबाजोगाई -गित्ता -जवळगाव रोडवरील पुलाचे काम पावसाळ्या पूर्वी होणे अपेक्षित होते मात्र अद्यापही या पुलाच्या कामास सुरवात झाली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई च्या जावयांचा पाहुणचार झाला असेल तर सा. बा. विभागाने अंबाजोगाई - गित्ता रोडवरील पुलाचे काम चालू करण्याच्या सूचना द्याव्या अशी म्हणण्याची वेळ नागरिकावर आली आहे.
अंबाजोगाई गित्ता जवळगाव या मार्गांवर वाहतूक मोठया प्रमाणात असते.प्रामुख्याने परळी मतदार संघातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी साधारणतः तब्बल 2 कोटी 42 लाखाचा निधी मंजुर होऊन कित्येक महिने झाले. परंतु अद्याप या पुलाचे काम सुरूच झाले नाही.हा पूल शेवटची घटका मोजत आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहते या वाहत्या पाण्यात अनेक दुर्दैवी घटना या पूर्वी घडल्या आहेत पुलावरून पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे परळी मतदार संघाला जोडणाऱ्या अनेक गावाचा संपर्क तूटतो.या पावसाळ्यात हा पूल वाहून जाण्याची शक्यता असल्याने या पुलाचे तात्काळ काम चालू करून पूर्ण गरजेचे आहे.अन्यथा पूल वाहून गेल्यास अनेक गावाचा संपर्क तुटून नागरिकांना 10 ते 15 किलोमीटर दुरून वाहतूक करावी लागेल.
आम्ही अभियंत्याशी अनेक वेळा संपर्क व पाठपुरावा करत आहोत प्रत्येक वेळी पुला खालील पाणी ओसरल नसल्याने आम्ही काम करू शकत नाहीत अशी कारणे देवून चाल ढकल करण्यात येत आहे. प्रत्यक्षात पुलाखालील पाणी जानेवारी महिन्यातच ओसरले आज पाणी ओसरून 5 महिने झाले असून 15-20 दिवसात पावसाळा सुरु होईल मात्र तरीही पुलाचे अद्याप काम चालू केले नाही.सदरील विषयासंदर्भात बातमी प्रकाशित केल्यानंतर संबंधित गुत्तेदाराने आमच्याशी संपर्क केला असता पावसाळ्यानंतर दिवाळीत काम सुरु करू असे आश्वासन देण्यात आले. परंतु मागील दिवाळी पासून आम्ही या विषयाचा पाठपुरावा सा. बा. विभागातील अभियंत्याशी केला त्यांनी त्याची दखल घेतली नाही फक्त चालढकल केली त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई च्या जावयांचा पाहुणचार झाला असेल तर सा. बा. विभागाने अंबाजोगाई - गित्ता रोडवरील पुलाचे काम चालू करण्याच्या सूचना द्याव्या अशी म्हणण्याची वेळ नागरिकावर आली आहे. दरम्यान या पावसाळ्यात दुर्दैवाने जर जीवित हानी घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी सार्वजनिक बांधकामाचे अभियंता किंवा संबंधित गुत्तेदार घेतील का ?
Comments
Post a Comment