मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे बनले गोरगरिबांचे देवदूत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख मंगेशजी चिवटे बनले गोरगरिबांचे देवदूत बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे दोन रुग्णांना उपचारासाठी मिळाला निधी . बीड(प्रतिनिधी ) बीड जिल्यातील गोरगरिब रुग्णांना संवेदनशील मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी अनेक गरजू गोरगरीब रूग्णांना अर्थसहाय्य मिळवून दिल्याने मंगेशजी चिवटे हे गोरगरीब लोकांना देवदूत वाटू लागले आहेत. युवा उद्योजक बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे नवजीवन बालरुग्णालय व सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर,येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या शिवतेज शहादेव मातकर रा. बाभूळवाडी ता.जी.बीड या मुलांच्या मेंदू रोग उपचारासाठी 50 हजार,तर दीपक जालिंदर घोडके ,लोळदगाव या दोन्ही रुग्णांच्या मेंदूरोग उपचारासाठी ,अपेक्स सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल संभाजी नगर 75 हजार अर्थ सहाय्य निधी सदरील दोन्ही हॉस्पिटल च्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याचे बाजीराव चव्हाण यांनी सांगितले असून मुख्यमंत्री आरोग्य साहाय्यता निधी कक्षाचे ...