गढी गावाचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार -सरपंच अंकुशराव गायकवाड
गेवराई प्रतिनिधी सखाराम पोहेकर :-गेवराई तालुक्यातील मौजे गढी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तो आता माननीय अमरसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आतंक परिश्रम घेऊन गडी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असे गडी ग्रामपंचायतचे सरपंच अंकुशराव गायकवाड यांनी सतत भैया साहेबाकडे व विजयराजे पंडित यांच्याकडे गडी गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न लावून धरला व तो सतत मागणी करून मंजूर करून घेतला व गोविंदवाडी तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी एक विहीर खोदून पाईपलाईन व येरवॉलचे काम अंतिम टप्प्यांमध्ये आलेले आहे तेव्हा येत्या पंधरा ते वीस दिवसात गढी गावाला पिण्याचे पाणी स्वच्छ व चांगले पाणी पिण्यासाठी मिळेल असे मनोगत गढी ग्रामपंचायतचे सरपंच अंकुशराव गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ आपले मत व्यक्त केले यावेळी त्यांच्यासोबत गडी ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेश कांबळे हे होते
Comments
Post a Comment