मुलांनो तुमच्या शिक्षणाचा उपयोग समाजाला व्हायला पाहिजे-अरुण भाऊ अडसड
श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे द्वारा संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कु-हा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबीर दिनांक 16 ते 23 मार्च 2023 या कालावधीत ग्राम अंजनसिंगी येथे आयोजित करण्यात आले या शिबिराचे समारोप दिनांक 23 मार्चला संपन्न झाले या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री अरुण भाऊ अडसड अध्यक्ष श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे तर प्रमुख अतिथी मा. श्री सुरेश भाऊ,मुंधडा संचालक श्रीराम शिक्षण संस्था धामणगाव रेल्वे मा. श्री विजयराव डहाके सदस्य महाविद्यालय विकास समिती कु-हा. सौ.रुपालीताई गायकवाड सरपंच ग्रामपंचायत अंजनसिंगी, सौ.सीमाताई तालन सदस्य ग्रामपंचायत श्री भोजराज जी हिवसे, सुरेशभाऊ कासमकर मा. श्री दिनेशराव शिरभाते अध्यक्ष कान्होजी महाराज संस्थान ,मा.प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम भगतसिंग सुखदेव राजगुरू या वीर सुपुत्रांना शतशः नमन करून आपल्या मार्गदर्शनपर भाषणाला सुरुवात केली. या समारोपीय कार्यक्रमात आपल्या मार्गदर्शन परभाषणात मा. श्री सुरेश भाऊ मुंदडा म्हणाले की शिक्षणा सोबत समाजसेवा चे पाठ ही आपण शिकले पाहिजे. मा. श्री विजुभाऊ डहाके आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अशा शिबिराच्या माध्यमातून चांगले संस्कार आपल्यावर होत असतात, रूपाली ताई यांनी सांगितले की या शिबिराच्या माध्यमातून अतिशय सुंदर शेततळ विद्यार्थ्यांनी बांधला आहे . मा. प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख यांनी आपल्या उद्बोधनातून तरुणांनी मदत करायला सदैव तत्पर असायला पाहिजे व 70x 30 फूट व अडीच फूट खोल बंधारा बांधल्यामुळे विद्यार्थी मित्रांचे त्यांनी कौतुक केले. अध्यक्ष भाषण माननीय श्री अरुण भाऊ अडसड म्हणाले की आज शहीद दिवस आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे भारत मातेचे वीर सुपुत्रांना शतशः नमन. विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना पुढे ते म्हणाले की तुमच्या शिक्षणाचा उपयोग समाजाला व्हायला पाहिजे. या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. विभाग देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन कु. निकिता राऊत हिने केले. यावेळी वैभव डहाके, हर्षल दारोकार, अक्षय पोकळे,कु साक्षी नेरकर,दिव्या सहारे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार डॉ.अजय अभ्यंकर यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना वंदे मातरम् या गीता द्वारे झाली.
Comments
Post a Comment