महिला सन्मान योजनेच्या शुभारंभा निमित्त भाजपच्या वतीने महिला प्रवाश्यांचे स्वागत



 देवणी प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या तिकीट दरात ५०% सवलत देण्याची घोषणा केली होती.या योजनेच्या अनुषंगाने दि.१७ मार्च रोजीपासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेत महिलांना ५०% टक्के सवलतीच्या दरात संपूर्ण महाराष्ट्रभर महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटीने प्रवास करता येणार आहे. 
या निमित्ताने देवणी तालुक्याच्या वतीने महिला प्रवासांचे पेठे देवून स्वागत वाहक चालक यांचे स्वागत करण्यात आले.
 
   यावेळी महिला प्रवाशांमध्ये आनंद दिसून आला तसेच महिलांनी राज्य सरकारने ही योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ही मानले. 
या वेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रंजना राजेंद्र पोलकर, व सर्व भाजप परिवारातील महिला उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी