Posts

तलाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

Image
तलाव भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, यांच्यावर कारवाईची टांगती तलवार! उच्च न्यायालयाचा दणका; चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर – भूसंपादन घोटाळ्यातील संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा : डॉ. गणेश ढवळे बीड:- (दि.२९) : बीड जिल्ह्यातील मेंगडेवाडी (ता. पाटोदा) येथील तलाव भूसंपादन प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि वकील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बनावट कागदपत्रे, खोटे अहवाल व बनावट सही-शिक्क्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून १ कोटी ४६ लाख ३५ हजार ७७७ इतक्या4 रकमेचा अपहार करण्यात आला असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई टाळल्याने शेतकरी बाबासाहेब रावसाहेब मेंगडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात रिट ...

अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय द्यावा. - कडुदास कांबळे

Image
        गेवऱाई ( प्रतिनिधी ) दि. 28 — महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उप-वर्गीकरण करून अत्यंत वंचित घटकांना प्राधान्य देण्याबाबत गेवराईचे तहसीलदार संजय सोनवणे यांच्यामार्फत महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे आणि पांडुरंग तुकाराम खरात यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.        निवेदनात राज्यघटना कलम १४, १५(४), १६(४), १७ व ४६ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयाचा संदर्भ देत राज्याने अनुसूचित जातींचे उप-वर्गीकरण करून अत्यंत वंचित गटांना प्राधान्य देण्याचा अधिकार असल्याचे सांगितले आहे. सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि आरक्षणाचा लाभ खरी गरज असलेल्या कुटुंबांपर्यंत नेण्यासाठी खालील प्रमुख मागणी करण्यात आल्या आहेत. १) महाराष्ट्रात “अनुसूचित जाती सामाजिक न्याय आयोग” किंवा तत्सम उच्चस्तरीय आयोग स्थापन करून अनुसूचित जातींचे सर्वंकष सर्वेक्षण करावे. आयोगाला उप-वर्गीकरण आणि क्रीमी लेयर संबंधी शिफारसी देण्याचे अधिकार द्यावेत. २) उप-वर्गीकरणाच्या माध्यमातून अस्पृश्यता, भूमी-ही...

परळी नगरपालिकेचा कोंडवाडा नेमका कुठे? मोकाट जनावरांचा शहरात हैदोस; दीपक देशमुख यांचा सवाल

Image
परळी नगरपालिकेचा कोंडवाडा नेमका कुठे? मोकाट जनावरांचा शहरात हैदोस; दीपक देशमुख यांचा सवाल परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक परिसरासह प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे बिनधास्तपणे वावरत असल्याने नागरिक, पदचारी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर परळी नगरपालिकेच्या मोकाट जनावरांसाठीच्या कोंडवाड्याच्या कार्यक्षमतेवर माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम काही दिवस चालविण्यात आली; मात्र त्यातून अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यानंतर शहरात मोकाट गायी, बैल व इतर जनावरांचा वावर वाढला असून राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकासह मुख्य मार्गांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर पदचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेने मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू केला आहे का, की तो केवळ कागदोपत्रीच आहे, असा सवाल करत देशमुख यांनी या कामावर झालेल्या खर्चाची आणि प्...

MPSC पेपरफुटीत नंदुरबार कनेक्शन; दोषींवर कठोर कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी

Image
शहादा प्रतिनिधी : MPSC औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.                महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाबाबत विद्यार्थ्यामध्ये व स्पर्धा परीक्षेची तयारी करणान्या उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व असंतोष निर्माण झाला आहे. सदर प्रकरणामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील हजारो विद्यार्थी अनेक वर्षापासून मेहनत, वेळ आ...

E20 इथेनॉल पेट्रोल बंद करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Image
शहादा प्रतिनिधी : E20 इथेनॉल पेट्रोल बंद करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री नवी दिल्ली यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.                  भारत सरकारकडून इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रण (E20) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, E20 इंधन सर्व वाहनांसाठी योग्य नाही. विशेषतः जुनी वाहने, दोन चाकी, तीन चाकी, लहान वाहने व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची वाहने E20 साठी अनुकूल नसल्याने त्याचा इंजिनवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे मायलेज कमी होणे, पिकअप कमी होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे व देखभाल खर्च वाढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांवर याचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे E20 इथेनॉ...

बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा

Image
बीड | प्रतिनिधी तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञेच्या धम्माचा प्रसार अधिक व्यापक व गतिमान करण्याच्या उद्देशाने पाटोदा येथील जावळे कुटुंबीयांनी आपल्या बुद्धघोष या मुलास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्या स्वाधीन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. हा दत्तक सोहळा मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या बीड येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) हे वर्षावासानिमित्त बीड येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे वास्तव्यास असून, धम्मप्रसारासाठीचा धम्मरथ देखील त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी जावळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बीड तालुकाध्यक्ष राजेंद्र ससाने बीड तालुका कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे, सुनील जावळे तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धघोष याला शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल धम्मप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. या प्रसंगी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांनी धम्माचा प्र...

भालचंद्र विद्यालयात शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

Image
भालचंद्र विद्यालयात शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार  शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम :- – डॉ. गणेश ढवळे  लिंबागणेश :- (दि. २८ ) :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल २५ जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज मंगळवारी (दि. २८) उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. मुकुंद मोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, पत्रकार हरिओम क्षीरसागर,प्राचार्य दत्तात्रय कवडे आणि वरिष्ठ लिपिक शिवाजी जाधव उपस्थित होते. यावेळी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कु. अंकिता कुंडलिक मांडवे, चि. श्रेयस लक्ष्मण कदम, सय्यद अल्मिन अजीम, कु. श्रुती मल्हारी ढास, कु. अनुजा दिनकर हिंदोळे,कु. स्नेहल बन्सी निर्मळ, श्री आनंद बारगजे तसेच इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेतील कु. सय्यद अलविना अजीम यांचा...