Posts

मांजरसुंभा घाटात दुचाकी अपघातात एक जण जखमी

Image
बीड प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 - मांजरसुंभा घाटात कोळवाडी जवळ वाहन चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटून डिव्हायडर वर गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवार (दि.२६) रोजी दुपारी २:४५ वाजता दुचाकी क्र. (एम.एच‌.23/एजी ०३२८) या पॅशन प्रो च्या चालकाचा ताबा सुटून दुभाजकावर आदळून अपघात झाला. अपघातामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाला असून बेशुद्ध आहे. खिशामध्ये कुठलेही ओळख पटण्यायोग्य सक्षम कागदपत्र आढळून न आल्यामुळे ओळख पटू शकली नाही. जखमी दुचाकी स्वारास माजी पंचायत समिती सदस्य बबन माने यांनी स्वतःच्या चार चाकी वाहनातून बीड जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास करून 'मोऱ्या' येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत रसिकांच्या भेटीला

Image
'सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’च्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल विशेष कुतूहल! मुंबई : लंडन येथील 'सोहोवाला कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा' या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा 'प्रीमियर शो' करण्याचा मान "मोऱ्या" या मराठी चित्रपटाने मिळवून, युरोपमधील प्रेक्षकांची हाऊसफुल्ल पसंती मिळविली आहे. ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' "मोऱ्या"चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा पासूनच या चित्रपटाविषयी कुतूहल वाढू लागले होते. 'एलएचआयएफएफ बार्सिलोना, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 'खजुराहो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'झारखंड आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव-२०२२', 'पेनझान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव', 'अयोध्या फिल्म फेस्टिव्हल', 'लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल', 'बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' इत्यादी राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांत "मोऱ्या"ने ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळविला आहे. आता नव्या वर्षात येत्या १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या ...

स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रीयतेच्या निषेधार्थ प्रेत शासन दारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन

Image
(बीड प्रतिनिधी )  बीड जिल्ह्यातील १३९४ पैकी ६५६ लहान मोठ्या गावात स्मशानभूमीची सुविधा नाही तर उर्वरित गावात स्मशानभूमीची दुरावस्था झाली असुन पत्रे शेड उडुन गेल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असुन   मृतदेहाची हेळसांड होत आहे.सार्वजनिक स्मशानभूमी नसलेल्या गावात भुमिहिन आणि मागासवर्गीयांना गैरसमजातून अंत्यसंस्कार विधी रोखल्याने गावात वादविवाद होऊन नातेवाईकांनी मृतदेह तहसिल तसेच ग्रामपंचायत कार्यालया समोर आणुन ठिय्या मांडल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत.शासन आपल्या दारी म्हणत जाहिरातीसाठी कोट्यवधींचा खर्च करणा-या जिल्हा प्रशासनाला अंत्यविधी सारख्या मुलभूत सुविधा स्मशानभूमी बांधण्यासाठी शासन दरबारी आंदोलने करावी लागत असुन हि लज्जास्पद बाब असुन याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'स्मशानभुमी अभावी प्रेत शासन दारी ' प्रतिकात्मक लक्ष्यवेधी आंदोलन करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचि...

राज्य परिवहन महामंडळाने पत्रकारांची राखीव जागा शेवटच्या सीटवर ढकलली

Image
राज्य परिवहन महामंडळाने पत्रकारांची राखीव जागा शेवटच्या सीटवर ढकलली सरकार पत्रकारांना त्यांची हक्काची सवलत देतय की जाणिवपूर्वक अपमान करतयं? मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा राज्यकर्त्यांना सवाल मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये अधिस्विकृती पत्रकारांना पूर्वी 11 व 12 नंतर 25 व 26 राखीव सीट वरून येत्या 1 जानेवारीपासून 27 व 28 नंबरवर राखीव जागा निश्चितीचा निर्णय घेतला असून महामंडळाचा हा निर्णय म्हणजे आपल्या योजनांच्या माध्यमातून विविध घटकांसाठी आम्ही खूप करतो असा प्रसिद्धीचा आव आणायचा आणि मिरवून घ्यावयाचे. मात्र ‘नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा’ असेच यांचे प्रदर्शन असून पत्रकारांना शेवटचे सीट देण्याची कृती ही अपमानास्पद वागणूक असून अजून पत्रकारांचा किती अपमान करणार? जाहीर केलेली हक्काची सीटही पत्रकारांना कधीच उपलब्ध नसते. सरकार पत्रकारांना हक्काची सवलत देतय की जाणिवपूर्वक अपमान करतय? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी सरकारला केला आहे. मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, एस.टी. महामंडळाच्या या कृत...

पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार रुग्णालयात मोफत मिळवण्यासाठी पाटोदेकरानी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढुन घ्यावा - नगरसेवक बाबुराव जाधव

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना व महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले योजना गरीबांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत असल्याने या दोन्ही योजनांचे महत्व विद्यमान पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक बाबुराव (आबा) जाधव यांनी सांगितले असुन या योजनेतंर्गत सरकार लोकांना 'आयुष्मान भारत कार्ड प्रदान करत आसुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना या योजनेअंतर्गत रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात यामुळे पाटोदा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्यासाठी सर्व पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड धारक यांनी रेशनकार्ड, आधार कार्ड,आधारला लिंक मोबाईल हे कागदपत्र घेऊन आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्रात जावा आशे आवाहन पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक बाबुराव (आबा) जाधव यांनी केले आहे.

परळीत श्री बजरंग बली वेताळ मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा

Image
परळी वैजनाथ/प्रतिनिधी   श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर जवळील श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी गाणगापूरच्या प्रथेप्रमाणे दुपारी १२ वाजता दत्त जन्मोत्सव उत्साहात झाला. जन्मोत्सवासाठी मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. श्री गुरुवर्य परमपूज्य विलासनंदजी महाराज यांच्या हस्ते श्रींचे पूजन महाआरती झाली. यावेळी दर्शनासाठी परळी शहर व पंचक्रोशीतून भाविक आले होते. यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गाणगापूरच्या प्रथेप्रमाणे दुपारी 12 वा. श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्ती पूर्ण व उत्साहात साजरा झाला. आज सोमवारी श्री वेताळ मंदिर येथे दत्त जन्मोत्सव निमित्त श्री विलासानंद महाराज यांच्या हस्ते गुरुंचे, पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिला भजनी मंडळांनी भक्तिगीते, भजन गायीले. दत्त जन्मोत्सव निमित्त श्री वेताळ मंदिर सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होती. महाप्रसादाने दत्त जन्मोत्सवाची सांगता झाली.

बीड जिल्ह्यातील नगरपरिषद /नगरपंचायत मध्ये कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा -- भाई गौतम आगळे

Image
परळी( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील एकूण ६ नगरपरिषद व ५ नगरपंचायत असून यामध्ये रोजंदारी कंत्राटी कामगार पुरवठा करणारे ठेकेदार / मक्तेदार सर्व विभागात कामे करून घेणारे अपात्र असून मुख्याधिकारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने रोख स्वरूपात कामगारानां अल्प / तुटपुंजा पगार तेही दोन- तीन महिन्यानंतर देऊन त्यांचे शोषण चालू आहे. शासनाची आणि कामगारांची फसवणूक सन२००० ते आजतागायत २३ वर्षात हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा करून शासनाच्या तिजोरीवर सामाजिक दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी केला आहे.        याबाबत सविस्तर वृत्त असे की रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या वतीने सतत आंदोलन केल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी सरकारी कामगार अधिकारी बीड यांना संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत कामगार कायद्याचे पालन करतात किंवा नाही याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अहवाल नुकताच मा. जिल्हाधिकारी बीड महोदया यांना सादर केला त्यात नगर...