बीड जिल्ह्यातील नगरपरिषद /नगरपंचायत मध्ये कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा घोटाळा -- भाई गौतम आगळे


परळी( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील एकूण ६ नगरपरिषद व ५ नगरपंचायत असून यामध्ये रोजंदारी कंत्राटी कामगार पुरवठा करणारे ठेकेदार / मक्तेदार सर्व विभागात कामे करून घेणारे अपात्र असून मुख्याधिकारी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने रोख स्वरूपात कामगारानां अल्प / तुटपुंजा पगार तेही दोन- तीन महिन्यानंतर देऊन त्यांचे शोषण चालू आहे. शासनाची आणि कामगारांची फसवणूक सन२००० ते आजतागायत २३ वर्षात हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा करून शासनाच्या तिजोरीवर सामाजिक दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी केला आहे.
       याबाबत सविस्तर वृत्त असे की रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांच्या वतीने सतत आंदोलन केल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी सरकारी कामगार अधिकारी बीड यांना संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत कामगार कायद्याचे पालन करतात किंवा नाही याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अहवाल नुकताच मा. जिल्हाधिकारी बीड महोदया यांना सादर केला त्यात नगरपरिषद / नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेत लागू होणारे कामगार कायदे किमान वेतन अधिनियम 1948 , कंत्राटी कामगार नियम व निर्मूलन अधिनियम 1970 , वेतन प्रदान अधिनियम 1936 , उपदान प्रदान अधिनियम 1972‌ , बोनस प्रधान अधिनियम 1965 , महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम 1983 , कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम 1952 व कर्मचारी राज्य विमा अधिनियम 1948 सर्व कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन करून रोजंदारी कंत्राटी कामगारांना त्यांच्या मूलभूत हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सदर गंभीर बाबीची शासनाच्या स्वतंत्र सक्षम यंत्रणेकडून अपात्र ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्याकडून कष्टकरी कामगारांचा हडप केलेला पगार हजारो कोटींची रक्कम त्यांच्याकडून वसूल करून संबंधित कामगारांना देण्यात यावी व घोटाळे बाजारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणी सह बीड जिल्ह्यातील सर्व कंत्राटी रोजंदरी कामगारांना नियमित करेपर्यंत समान काम , समान वेतन देण्यात यावे , मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांनी फक्त महिला सफाई कामगारांना अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले त्यांना कामाच्या व पगाराच्या सलगतेसह तात्काळ कामावर घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी 27 डिसेंबर 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे रोजंदारी मजूर सेनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तरी सदरिल आंदोलनात सर्व कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन कामगार नेते तथा संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी