मांजरसुंभा घाटात दुचाकी अपघातात एक जण जखमी
बीड प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869 - मांजरसुंभा घाटात कोळवाडी जवळ वाहन चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटून डिव्हायडर वर गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवार (दि.२६) रोजी दुपारी २:४५ वाजता दुचाकी क्र. (एम.एच.23/एजी ०३२८) या पॅशन प्रो च्या चालकाचा ताबा सुटून दुभाजकावर आदळून अपघात झाला. अपघातामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाला असून बेशुद्ध आहे. खिशामध्ये कुठलेही ओळख पटण्यायोग्य सक्षम कागदपत्र आढळून न आल्यामुळे ओळख पटू शकली नाही. जखमी दुचाकी स्वारास माजी पंचायत समिती सदस्य बबन माने यांनी स्वतःच्या चार चाकी वाहनातून बीड जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.
Comments
Post a Comment