मुंबईच्या गँगवॉरपासून ते पुण्याच्या कोयता गँगपर्यंत - महाराष्ट्र प्रशासनाने धडा घेतला का?-बीड शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर
मुंबईच्या गँगवॉरपासून ते पुण्याच्या कोयता गँगपर्यंत - महाराष्ट्र प्रशासनाने धडा घेतला का?-बीड शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर
आष्टी ( प्रतिनिधी-- गोरख मोरे) :
मुंबईकरांना अंडरवर्ल्डच्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी मोठी किंमत मोजली असून दाऊद/
गवळी/छोटा राजन यांच्या काळात मुंबईकर बंदुकीला घाबरत होते. त्याच इतिहासातून महाराष्ट्र प्रशासन काहीच शिकले नाही का? असा सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड ऋआजिनाथ (भाऊ) खेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केला .
पुढे सांगितले की, पुणे पूर्वी शिक्षणाचे माहेरघर होते. आज तिथे कोयता गँग/टोळीयुद्ध/सोशल मीडियावर शक्तिप्रदर्शन सुरू असून 25 नोव्हेंबर 2026 रोजी शिवाजीनगर कोर्ट परिसरातच एका आरोपीवर हल्ला होऊन त्याचा हात छाटला गेला, 2 पिस्तुले सापडली असुन जिथे न्याय मिळतो, तिथेच जर सूड उगवला जात असेल तर !सामान्य माणसाने जायचं कुठे? असा प्रश्न निर्माण झाला.
तसेच NCRB 2024 नुसार पुण्यात हिंसक गुन्हे 2,296 वरून 3,573 वर गेले. पोलीस आयुक्त म्हणतात गुन्हे कमी झाले, पण नागरिकांच्या मनातली भीती आकडेवारीने जात नसल्याचे सांगितले असून त्यांच्या मते मुख्य 3 प्रश्न असुन ,
यामध्ये 1)गुन्हेगारांना राजकीय संरक्षण का मिळते? 2)पोलिसांचा धाक का कमी झाला?
3)अल्पवयीन मुलं गुन्हेगारीत का जातात ?
तसेच आजिनाथ (भाऊ ) खेडक यांनी सांगितले की , शहर किती सुरक्षित आहे , हे पोलिसांच्या संख्येवर नाही तर ! गुन्हेगाराला कायद्याची भीती किती ? आहे यावर असुन , ही समस्या फक्त पुण्याचीच नाही तर संबंध महाराष्ट्राची असल्याचे शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी सांगितले.
Comments
Post a Comment