बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी


पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथे शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की
बेदरवाडी येथील शेतकरी अण्णासाहेब खंडू काकडे शेतामध्ये जनावरांना चारण्यासाठी गेले असता दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला शेतकऱ्यांनी बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी आरडाओरड केला असता त्यांचे सर्व जनावरे शेतकऱ्यांकडे धावल्यामुळे तो बिबट्या पळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचा हल्ल्यातून जीव वाचला असून त्या जखमी शेतकऱ्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असून शेतकरी गंभीर जखमी असून ह्या घटने मुळे परिसरात घबराट पसरली असून बेदरवाडी सह परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहान बेदरवाडीचे माजी सरपंच रवींद्र राजवन यांनी केले आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !