दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार
दिवाळी शिध्याचे वाटप; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद!
पाटोदा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत गोरगरीब शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या घरातही सणाचा आनंद निर्माण व्हावा, या उदात्त उद्देशाने शिवसेनेच्या वतीने दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब तसेच राज्याचे रोहयो मंत्री तथा बीड जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा. ना. श्री. भारतशेठ गोगावले यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
यावेळी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर देण्यात आला. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी शिवसेना कटिबद्ध – राहुल भैय्या चौरे
यावेळी आपल्या मनोगतपर भाषणात शिवसेनेचे पाटोदा तालुकाप्रमुख राहुल भैय्या चौरे म्हणाले की, “सध्या पाटोदा तालुक्यात दुष्काळाचे अत्यंत गंभीर संकट निर्माण झाले असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना केवळ आश्वासन देऊन थांबणार नाही, तर गरजूंच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणार आहे.
दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था, आर्थिक अडचणींमुळे मुला-मुलींच्या विवाहात येणाऱ्या अडचणींवर मदत, तसेच गरजेनुसार जनावरांसाठी चारा छावण्यांसाठी पुढाकार आणि इतर आवश्यक मदत शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. कोणतेही गरजू कुटुंब मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील,” अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून दिली.या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. स्वप्नील भैय्या गलधर, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. सुमित कोळपे, शिवसेनेचे पाटोदा तालुकाप्रमुख राहुल भैय्या चौरे यांच्यासह पाटोदा तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच धनगरजवळका येथील शेतकरी बांधव, गावातील सरपंच, उपसरपंच आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलावा, त्यांच्या घरात सणाचा गोडवा निर्माण व्हावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या भावनेतून शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
Comments
Post a Comment