कुमशी (ता./जि.बीड) येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा


कुमशी (ता./जि.बीड) येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
बीड (प्रतिनिधी, 27/11/26):"भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा खरा आत्मा आहे,प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्ये आणि हक्कांची जपणूक करणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन रिपाई चे बीड अध्यक्ष किशन तांगडे यांनी केले,ते कुमशी येथिल रिपाई शाखा च्या वतीने ने आयोजित केलेल्या "संविधान दिन गौरव कार्यक्रमात" प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
    मौजे कुमशी ग्रामस्थांच्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा कुमशी च्या पुढाकाराने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. 
या कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
    याप्रसंगी बीड चे रिपाई अध्यक्ष किशन तांगडे यांच्यासह,जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड,दिव्यांग चे जिल्हाधक्ष शाहू डोळस,भीमराव घोडेराव आणि कार्यक्रमाचे संयोजक मिठू वाघमारे यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये आणि अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला कुमशीचे सरपंच निकम,राहुल कांबळे,विनोद शेजवळ,विजय ओव्हाळ,भैय्यासाहेब वाघमारे,दयानंद उबाळे,विशाल गव्हाणे,मोहन खेमाडे,शांतीलाल पवार,भास्कर जावळे,दिलीप ससाणे,भागवत साबळे यांच्यासह गावातील महिला,पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपाई शाखा कुमशी च्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले !

   

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी