सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाइन पद्धतीने सुरू
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन ऑनलाइन पद्धतीने सुरू
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या मागणीला यश; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांचे मानले आभार
बीड : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीची दखल घेऊन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहेमान यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याबाबत तातडीने कार्यवाही केल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
संघटनेचे राज्याध्यक्ष शेख वजीर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाध्यक्ष हनीफ खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष ध्रुपद यादव, जिल्हा सचिव नजीउल्ला खान, कोषाध्यक्ष सुग्रीव नेटके, सहसचिव अशोक कुलकर्णी व जिल्हा सदस्य दिलीप वखरे यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहेमान यांची भेट घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन ऑनलाइन पद्धतीने अदा करण्याबाबत निवेदन सादर केले होते.
या निवेदनाची तातडीने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार पंचायत समिती स्तरावरून सर्व गटविकास अधिकारी व त्यांचे पेन्शन विभागात कार्यरत असलेले सहकारी कर्मचारी यांनी तत्परतेने देयक सामान्य प्रशासन विभागात दाखल केले सामान्य प्रशासन विभागातील श्री कदम यांनी अति तातडीने देयक वित्त विभागात सादर केले जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. गायकवाड यांनी तातडीने कार्यवाही करून सेवानिवृत्ती वेतनाची देयके कोषागार कार्यालय, बीड येथे दाखल केली. कोषागार कार्यालयातील अमित वायकर यांनी तत्परतेने देयके पारित करून कोषागार अधिकारी श्री बाब्रस यांची मंजुरी घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची कार्यवाही पूर्ण केली.
या कामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहेमान, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे, सामान्य प्रशासन विभागातील श्री. कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयातील बापू गायकवाड,ठोंबरे, घायाळ साहेब , ढाकणे तसेच सर्व गटविकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावरील सर्व सहकारी कर्मचारी या सर्वाच्या सहकार्याने पेन्शन दिवाळी पूर्वी ऑन लाईन पेन्शनरच्या खात्यावर जमा झाली आहे याबद्दल सर्वांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले व पेन्शनरची दिवाळी गोड झाले बाबत मन प्रसन्न झाले.
Comments
Post a Comment