शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बळीराजाच्या सन्मानासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सदैव सोबत
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बळीराजाच्या सन्मानासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सदैव सोबत-- बीड उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर /शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान (काका) मोरे
पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवसेना मदत अभियान /शेतकरी समस्या निवारण दौऱ्याचा' आज ७ वा दिवस
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे) :
शिरूर कासार तालुक्यातील खलापुरी जिल्हा परिषद गट रायमोहा येथे आज मंगळवारी सकाळी ठीक ८:०० वाजता भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला.
या संवादादरम्यान दुष्काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रमुख मागण्या--- पीक नुकसानीचे पंचनामे, विमा आणि कर्जमाफी यांसारख्या समस्या समजून घेतल्या .
हे प्रश्न शासन दरबारी लावून धरून मागण्यांची पूर्तता करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पूर्ण ताकदीने कटिबद्ध असल्याचा विश्वास याप्रसंगी बीड जिल्हा उपप्रमुख आजिनाथ (भाऊ )खेडकर /शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान (काका )मोरे यांनी या दरम्यान दिला .
संकटाच्या या काळात बळीराजाला केवळ पोकळ आश्वासने न देता, त्याच्या पाठीशी ढाल बनून खंबीरपणे उभे राहणे हीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची शिकवण असल्याचे सांगितले .
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दौऱ्याचे नेतृत्व- प्रमुख उपस्थिती--
मा. सोपान काका मोरे (तालुकाप्रमुख, शिवसेना)
मा. आजिनाथ भाऊ खेडकर (उपजिल्हाप्रमुख, शिवसेना)
मा. आयुब भाई शेख (अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख)
मा. शिवम आरेकर (उपतालुकाप्रमुख)
मा. अभिषेक भोसले (पाडळी गटप्रमुख)
मा. पृथ्वीराज (पाडळी गणप्रमुख)
या प्रसंगी गावासह जिल्हा परिषद गटातील सर्व ज्येष्ठ, शेतकरी बांधव / खलापुरी ग्रामस्थ/ शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी /बळीराजाच्या सन्मानासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सदैव सोबत असून शेतकऱ्यांच्या घामाला दाम आणि त्यांच्या हक्काचा न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा अविरत सुरूच राहणार असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख सोपान( काका ) मोरे / उपजिल्हाप्रमुख शिवसेना आजिनाथ (भाऊ )खेडकर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले .
Comments
Post a Comment