पंकजाताईंच्या आवाहनाला बगल देऊन बीडमध्ये तुफान आतिषबाजी-बीड शहर बचाव मंच
पंकजाताईंच्या आवाहनाला बगल देऊन बीडमध्ये तुफान आतिषबाजी-बीड शहर बचाव मंच
भाजपाच्या मोठ्या नेत्यांसह छोट्या-मोठ्या सर्वच नेत्यांच्या घरासमोरही आतिषबाजी
बीड शहरातील प्रदूषणाचा स्तर पराकोटीला
नेते, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीच जबाबदारी स्वीकारत नाहीत ही मोठी खंतच
बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या आदरणीय पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी खूप सोज्वळपणे बीडकरांवर विश्वास टाकत प्रदूषण मुक्त व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. परंतु ताईंच्या सोज्वळपणाचा विश्वासघात करत बीडकरांनी तुफान फटाकेबाजी व आतिषबाजी केल्याचे सर्वत्र कानाकोपऱ्यातून दिसून आले. वास्तविकपणे ताईंनी केलेले आवाहन व अंमलबजावणी हे बीडकरांच्या आरोग्यदायी जीवनासाठी उपयुक्त ठरणार होते तसेच पर्यावरणाच्या व सर्वांच्या दृष्टीने हिताचे देखील होते. परंतु सर्वच बीडकरांनी पर्यावरण मंत्री ताईंच्या आवाहनाला बगल देत सर्वांच्याच घरासमोर आणि त्याचबरोबर भाजपाच्या एका मोठ्या नेत्या सह बऱ्याच छोट्या मोठ्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या ही घरांसमोर आणि बंगल्यांसमोरही आतिषबाजी होताना दिसून आली. यात शहरातील व्यापारी वर्ग व नागरिक ही मागे नव्हते. खरे पाहता हे ताईंनी केलेले आवाहन सर्वांच्याच हिताचे होते व याची जबाबदारी स्वीकारणे हे सर्वांचे कर्तव्य होते. परंतु शहरातील जबाबदार लोकांच्या घरासमोर रात्री उशिरापर्यंत फटाके उडत असताना दिसून आले. यापुढील काळात प्रशासनाने, शासनाने व पर्यावरण खात्याच्या मंत्री पंकजाताईंनी महाराष्ट्रातील सर्व फटाके उत्पादकांचे तसेच महाराष्ट्रामध्ये फटाके वितरण करणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत. म्हणजेच"ना रहेगा बास ना बजेगी बासुरी".. अशी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सर्व जनतेच्या हितार्थ मागणी करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment