बीडमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; रेकॉर्डवरील आरोपी गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह जेरबंद
बीडमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; रेकॉर्डवरील आरोपी गावठी पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह जेरबंद
बीड प्रतिनिधी :दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात पेट्रोलींग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका रेकॉर्डवरील आरोपीला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बीड शहरातील सागर हाईट्स परिसरातून करण दुर्गा भटनागर (वय ४२ वर्ष, रा. इंदूर, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ₹४०,०००/- किमतीची निळसर रंगाच्या बॅगमधील गावठी बनावटीची पिस्तूल (मॅगझिनसह) आणि ₹२,०००/- किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ₹४२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी अमळनेर (जि. जळगाव) आणि जामखेड (जि. अहिल्यानगर) पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक, बीड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.
Comments
Post a Comment