Farmer ID मधील त्रुटी आणि दुष्काळ अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; परळी तालुक्यात ७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

Farmer ID मधील त्रुटी आणि दुष्काळ अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; परळी तालुक्यात ७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
              सिरसाळा/प्रतिनिधी:-​ Farmer ID मधील गंभीर त्रुटींमुळे शेती क्षेत्र दुसऱ्याच व्यक्तीच्या आयडीला जोडले गेल्याने एका शेतकऱ्याला दुष्काळ अनुदानापासून आणि नवीन पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा, यासाठी पिंपरी बुद्रुक येथील शेतकरी केशव दिलीप सटाले यांनी दिनांक ७/१०/२०२६ रोजी पिंपरी बु. येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.सविस्तर वृत्त असे की,शेतकरी शशीकला दिलीप सटाले यांच्या Farmer ID मधील तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची शेतजमीन त्यांच्या आयडीला लिंक होत नाही.सध्या दुष्काळ जाहीर झाला असून नुकसान पंचनामे सुरू आहेत, मात्र आयडीमधील चुकीमुळे दुष्काळ अनुदान मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे तसेच नवीन पीक कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध होत नाही.​या गंभीर समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. अखेर न्याय मिळवण्यासाठी दिनांक ७/१०/२०२६ रोजी पिंपरी बुद्रुक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अर्जदार शशीकला दिलीप सटाले व उपोषणकर्ते केशव दिलीप सटाले यांनी परळी तहीसलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे. तसेच या निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड,मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय परळी वैजनाथ आणि तालुका कृषी कार्यालय परळी वैजनाथ यांना माहीतीस्तव पाठवण्यात आली आहे. 

                      

          प्रमुख मागण्या

तडोळी येथील गट क्रमांक १२८ चा Farmer ID योग्य Farmer ID मध्ये जोडावा. 

पिंपरी बु. येथील गट क्रमांक ९५ मधील शेतकरी शेशकला बाबुराव गट नंबर ९५ यांची शेतजमीन दुसऱ्याने वापरलेली असून ती योग्यरीत्या लिंक करावी.

Farmer ID मधील त्रुटी तातडीने दूर करून दुष्काळ अनुदानाचा लाभ सुनिश्चित करावा व नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी