आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवले यश
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवले यश--
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेच्यात विद्यार्थ्यांनी खोवला मानाचा तुरा--
आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
जिल्हास्तरावर संपन्न होत असणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेमध्ये जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले .
१० ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हास्तरावरती क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या . या क्रीडा स्पर्धा मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकाराचा उत्कृष्ट सराव करत हे उत्तुंग यश मिळवले .
यामध्ये कोल्हे आदित्य. रा. वाघळुज . भालाफेक स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तर ओमकार मिसाळ. रा. हातोळण थाळीफेक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल जनता वसतीगृह शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विजयकुमार बांदल अण्णा. अध्यक्ष .श्री अब्दुल भाई सय्यद. संस्थेचे व्यवस्थापक श्री. विशाल (भैय्यासाहेब) बांदल.प्राचार्य श्री .सय्यद ए. डी सर. उपप्राचार्य श्री. तिपुळे सर. उपमुख्याध्यापक श्री. गवळी सर. पर्यवेक्षक श्री घोडेस्वार सर. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी. पालक वर्ग यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन कौतुक करत त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी विद्यार्थी खेळाडूंना श्री.गुरसाळी सर /श्री. पोकळे सर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले .
धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेळामध्ये यश मिळवून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोल्याने जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान निश्चितच उंचावली .
Comments
Post a Comment