धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेमध्ये फडकवला विजयाचा झेंडा
धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेमध्ये फडकवला विजयाचा झेंडा--
रौप्य व कांस्यपदकाच्या ठरल्या मानकरी--
जनता शिक्षण संस्थेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा--
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे) :
खोपोली येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुमारी. स्वरा मोडक. ६२ केजी गटामध्ये रौप्य पदक , कुमारी तनुजा गोडांबे ५५ केजी कास्यपदक, तर कुमारी अद्विता फिरंगे ३३ केजी गटामध्ये कास्यपदक पटकावले .
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूं विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले . जणता शिक्षण संस्थेच्या शिरपेच्यात पुन्हा मानाचा तुरा खौवला .
या सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थिनींचे जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव श्री. विजयकुमार बांदल (अण्णा) , अध्यक्ष श्री. अब्दुल (भाई) सय्यद. प्राचार्य श्री. सय्यद ए .डी सर,संस्थेचे व्यवस्थापक श्री. विशाल( भैय्यासाहेब) बांदल , वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. विक्रम बांदल सर,उप प्राचार्य श्री. तिपुळे सर,उपमुख्याध्यापक श्री. गवळी सर,पर्यवेक्षक श्री. घोडेस्वार सर,व सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी/ पालक वर्ग सर्वांनी अभिनंदन/ कौतुक करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment