राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत बीडचा डबल धमाका; मुलींनी पटकावले उपविजेतेपद, तर मुले ठरले तृतीय

राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत बीडचा डबल धमाका; मुलींनी पटकावले उपविजेतेपद, तर मुले ठरले तृतीय

 रोल बॉलमध्ये बीडचा बोलबाला! मुलींचे उपविजेतेपद अन् मुलांचा संघ ठरला तृतीय क्रमांकाचा मानकरी
बीड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र रोल बॉल असोसिएशन व यवतमाळ जिल्हा रोल बॉल असोसिएशन यांच्या वतीने ही स्पर्धा दि. ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्कूल ऑफ स्कॉलर्स, एम.आय.डी.सी. दारव्हा रोड, यवतमाळ येथे घेण्यात आली. या स्पर्धेत राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता.
 यवतमाळ येथे पार पडलेल्या १६ व्या मिनी (११ वर्षांखालील) महाराष्ट्र राज्य रोल बॉल अजिंक्यपद स्पर्धा - २०२६ मध्ये बीड जिल्ह्याने दुहेरी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत बीडच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद (द्वितीय क्रमांक) तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावत जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे 
बीड जिल्हा रोल बॉल असोसिएशन च्या वतीने आतापर्यंत राज्यस्तरीय रोल बॉल स्केटिंग स्पर्धेसाठी जवळपास ४००हून अधिक तर राष्ट्रीय स्पर्धेत २० हून अधिक खेळाडूंची निवड झाली आहे .

मुलींची ऐतिहासिक कामगिरी:
 बीडच्या मुलींच्या संघाने साखळी फेरीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. अंतिम सामन्यात बीड विरुद्ध मुंबई सिटी अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत 06 - 07 थोडक्यात पराभव स्वीकारावा लागल्याने संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले..

उपविजेत्या संघात प्रियल नितीन धांडे(संघ प्रमुख/कर्णधार),आनंदी रमेशवर घोडके, अंझिला अहद शेख, मैत्रेयी अनिकेत कुलकर्णी,श्रेया सतीश बेटकर, रिया प्रवीण कोलंगडे, उमे सलमा झोहरा यांचा समावेश होता.
आनंदी घडके ला मिळाला बेस्ट प्लेअर अवार्ड 

मुलांनीही राखली शान:
मुलांच्या गटातही बीडच्या संघाने दमदार खेळ करत तृतीय क्रमांक पटकावला. कांस्यपदकाच्या लढतीत बीडच्या मुलांनी प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करत हे यश मिळवले.
तृतीय क्रमांकाचा मानकरी मुलांचा संघ 
१) जय दिनकर सुपेकर, २) प्रणय सुधीर हजारे, ३) अथर्व दिलीप गोरे, ४) सिदनाक बापूसाहेब वाघमारे, ५) निकुंज राजेश तोष्णीवाल(संघ प्रमुख/कर्णधार), ६) अद्वित प्रदीप ससाणे, ७) राघव रामेशवर घोडके, ८) अनय अमोल मोहळकर, ९) दर्श हरिओम धुप्पड, १०) राज गणेश नहार, ११) हमाद साकिब इम्रान मोमीन


या दोन्ही संघांना प्रशिक्षक वैभव हरिश्चंद्र गिरी, सुधीर शंकरराव हजारे व निकिता कुंडलिक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल जिल्हा माजी आमदार सुनीलदादा धांडे,सचिव रामदास अश्रुबा गिरी,शिवसेना बीड जिल्हा संघटक नितीनभैया धांडे,जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर,क्रीडा अधिकारी अनिकेत काळे,चंपावती योगा ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब माने,सागर घोडके ,अन्य शिक्षक पालक वर्ग व क्रीडा प्रेमींनी संघाचे अभिनंदन केले असून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी