बीड शहराचा पाणीपुरवठा प्रश्न, आता दिसतो आहे का ? गेली 35 40 वर्ष तुम्ही सत्तेत काय केल?
बीड शहराचा पाणीपुरवठा प्रश्न, आता दिसतो आहे का ? गेली 35 40 वर्ष तुम्ही सत्तेत काय केल?
बीड शहर बचाव मंचचे अध्यक्ष नितिन जायभाये यांचा खडा सवाल
बीड शहरामध्ये प्रचंड भीषण पाणी टंचाई चे संकट, दुष्काळ सदृश्य परिस्थिती प्रशासन आणि पालिकेचे शासन याबाबतीत प्रचंड उदासीन
बीड प्रतिनिधी : बीड शहरांमध्ये निर्माण झालेल्या प्रचंड भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काही नेते नगरपालिकेच्या प्रशासना सोबत बैठका करत आहेत. परंतु या सर्वांना बीड शहर बचाव मंचाच्या अध्यक्ष या नात्याने मी प्रश्न विचारत आहे की तुम्ही गेली 35-40 वर्ष सत्तेत राहून काय केल ?; अटल अमृत जल योजनेच काय केल ? अटल अमृत जल योजना अपूर्ण का राहिली ? अयशस्वी का झाली ?
आज अकस्मात गंभीर होत या बैठका करणाऱ्या नेत्यांच्या हातात एक हाती सत्ता असताना सुद्धा यांना बीड शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रश्न यापूर्वी दिसले नव्हते का ? आज बीड शहरावर ही वेळ का आली ? आता इथून पुढं वर्षभर कोरड्या दुष्काळ काळामध्ये नागरिकांनी काय करायच, कसं जगायचं ? पुढच्या वर्षी पाऊस पडेपर्यंत बीड शहराची तहान कशी भागणार ?
अतिशय प्रचंड भीषण पाणी टंचाईचे संकट यावर्षी बीड शहरावर येत आहे.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये नक्की काय चाललं आहे. प्रचंड बोगसगिरी आणि भ्रष्टाचार तिथं माजलेला आहे. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार तिथ होत आहे. बीड शहरामध्ये अनाधिकृत नळ कनेक्शनची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. हजारो नळ कनेक्शन (हा आकडा खूप प्रचंड मोठा आहे) हे बोगस आहेत. जे नळ कनेक्शन्स नोंदणीकृत नसून अनाधिकृत आहेत याची खरी आकडेवारी नगरपालिकेने तात्काळ जाहीर करावी. नगरपालिकेमध्ये चांगल्या अधिकाऱ्यांना टिकू दिले जात नाही, काम करू दिले जात नाही. लोकांच्या मागण्या, अर्ज, निवेदने याला सरळ कचऱ्याची टोपली दाखवण्यात येते. काही वार्डांमध्ये गुंडगिरी पद्धतीचा अवलंब केला जातो असा काही अधिकाऱ्यांचा सुद्धा अनुभव राहिलेला आहे. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागा च्या अंतर्गत काही वार्डांमध्ये कुणीही उठतो आणि गुत्तेदार होतो आणि स्वतःच्या मनानेच अवैध कनेक्शन लोकांना देतो . ज्याची कुठेही नोंद नसते. या सर्व गोष्टींना आळा बसणे गरजेचे आहे. काही काळापूर्वी शासनाने पाणीपुरवठा विभागाला प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या निधीमार्फत आता काय कामे चालू आहेत ? या निधीच काय करण्यात आल ? शहरांमध्ये व शहराच्या भोवती कुठेही काहीही काम करण्यात येत आहे असे काहीही दिसत नाही किंवा काही योग्य रचनात्मक कल्पक पद्धतीने पाणीपुरवठा विभागातून काही नवीन योजना केल्या जात आहेत असेही कुठेही दिसून येत नाही. बीड शहरातील अनेकानेक भागांना एक महिन्यापासून पिण्याचे पाणीच मिळालेले नाही. नगरपालिका प्रशासन आणि शासन बीड शहराच्या पाणी पुरवठ्या विषयी इतके का उदासीन आहे कळायला मार्ग नाही. प्रचंड गलथान कारभार या पाणीपुरवठा विभागांमध्ये चालतो हा आमचा गेल्या काही वर्षापासून चा अनुभव आहे. निवडणुका झाल्यावर केलेल्या डोंगरभर घोषणा धुळीला मिळाल्या. पुन्हा जैसे थे' तीच परिस्थिती. कारभारात सुधारणा काही होत नाही. शहरातील नागरिकही अशाच नेत्या पुढाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडतात ही मोठी खंत आहे, शोकांतिका आहे. सद्य परिस्थितीमध्ये आणि पुढच्या काळामध्ये बीड शहरामध्ये प्रचंड व भीषण पाणी टंचाई उद्भवणार आहे याचे संकेत आतापासूनच मिळू लागलेले आहेत. यासाठी तात्काळ पाण्याचे नियोजन व पाणीपुरवठ्या संबंधी इतर उपाययोजना राबवण्यात येण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी रचनात्मक व कल्पकतेने योग्य आराखडे तयार करून सर्व लोकप्रतिनिधींनी योग्य त्या इच्छाशक्ती द्वारे काम करून येणाऱ्या काळामध्ये भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळा बरोबर लढणे गरजेचे झालेले आहे. आजही योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले तर बीड शहराला आठ दिवसांमध्ये दोनदा पाणीपुरवठा करण्यात येऊ शकतो. परंतु नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेचे प्रशासन आणि शासन या बाबतीत प्रचंड उदासीन असल्याचे या निमित्ताने दिसून येते.
Comments
Post a Comment