राष्ट्रवादी भवन ते लेंडीनाला रस्ता खोदून नागरिकांना वेठीस धरल्याचा सरपतेचा आरोप
राष्ट्रवादी भवन ते लेंडीनाला रस्ता खोदून नागरिकांना वेठीस धरल्याचा सरपतेचा आरोप
बीड : राष्ट्रवादी भवन ते लेंडीनाला रस्ता मार्च २०२६ मध्ये मंजूर झाला असला तरी काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यालगत पाईपलाईनचे कामही मंजूर असून, पहिले पाईपलाईन आणि त्यानंतर रस्त्याचे काम करण्यात येईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले होते.
मात्र संबंधित कंत्राटदाराने संपूर्ण रस्ता खोदून ठेवल्याने परिसरात पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यामुळे शहंशाह नगर परिसरातील नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, नगरपरिषदेचे अभियंता श्री. माने यांनी पाईपलाईन कामाची वर्क ऑर्डर अद्याप दिलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद सरपते सातत्याने पाठपुरावा करत असूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नगरपरिषद प्रशासन, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांना वेठीस धरू नये; पाईपलाईनची वर्क ऑर्डर तातडीने देऊन काम पूर्ण करावे आणि त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment