चौसाळ्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने माहिती अधिकाराचे केले उल्लंघन
चौसाळ्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने माहिती अधिकाराचे केले उल्लंघन
घनकचरा योजना, पाणंद रस्त्याच्या कामात केलेले आर्थिक घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती स्थापन करावी अशी गटविकास अधिकाऱ्याकडे केली मागणी- अशोक सोनवणे.
(बीड प्रतिनिधी )बीड तालुक्यातील चौसाळा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी माहिती अधिकाराचे उल्लंघन केले असून मागितलेली माहिती देण्यास नकार दिला आहे. चौसाळा गावामध्ये घनकचरा योजना, पाणंद रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्याची चौकशी समिती स्थापन करून झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड यांच्याकडे केली आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, चौसाळा ग्रामपंचायतीला गावाच्या विविध प्रकारच्या विकास करण्यासाठी शासनाकडून निधी मिळाला आहे. त्यामध्ये घनकचरा ही एक योजना आहे. गावांमध्ये सांडपाण्याचे खड्डे तयार करणे, ओला कचरा व सुका कचरा टाकण्यासाठी खड्डे खोदणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे, गाव रोगराईमुक्त करणे या आदी कामासाठी शासनाकडून सण सन 2023- 2024 मध्ये 54 लाख रुपये मंजूर होऊन तो निधी ग्रामपंचायतला प्राप्त झाला. प्रत्यक्षात दोन वर्षात सदरील घनकचरा योजनेचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते ते काम गुत्तेदार, शाखा अभियंता व ग्रामविकास अधिकारी यांनी पूर्ण केले नाही. घनकचरा योजनेच्या कामाचे पैसे मात्र गुत्तेदारांनी उचललेले आहेत. तसेच चौसाळ्यातील तीन पानंद रस्त्यासाठी ग्रामपंचायतीला निधी मिळाला आहे व पाणंद रस्ते कुठे गेले आहेत? हे अर्धवट आहेत की पूर्ण झाले आहेत?हे जनतेला माहीत नाही. आपण घनकचरा योजना पानंद रस्ते योजनेचे कामे झाली आहेत काय? याच्यावर किती खर्च झाला आहे? कोण कोणत्या ठिकाणी कामे झाले आहेत?याची माहिती मी माहितीच्या अधिकारात मागितली होती परंतु, चौसाळ्याचे ग्रामविकास अधिकारी श्री चव्हाण साहेब हे मला माहिती देण्यास टाळाटाळ करून माहिती दिली नाही. घनकचरा योजना व पानंद रस्ता योजना या दोन्ही योजनेमध्ये अपहर, भ्रष्टाचार झालेला आहे. या कामाचे जिम्मेदार ग्रामविकास अधिकारी श्री चव्हाण व संबंधित गुत्तेदार व ग्राम रोजगार सेवक हे जिम्मेदार असून घनकचरा योजनेच्या कामाची व पानंद रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन करावी व दोशी असणारे ग्रामविकास अधिकारी व संबंधित गुत्तेदार व ग्रामरोजगार सेवक यांच्यावर कारवाई करावी नसता आपण लोकशाही मार्गाने जिल्हाधिकार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे पत्रक असे सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे .
Comments
Post a Comment