भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने तळवट बोरगाव येथे 'एकदिवसीय महिला-पुरुष शिबिर'
भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने तळवट बोरगाव येथे 'एकदिवसीय महिला-पुरुष शिबिर'
गेवराई प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी तळवट बोरगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथे एकदिवसीय महिला-पुरुष समता सैनिक दल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक तथा कमांडर इन चीफ मिराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड. भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि मुंबई कार्यालय प्रमुख एस. के. भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिराला महाराष्ट्र राज्य संरक्षण सचिव अमरसिंह ढाका, मेजर जनरल तथा संरक्षण उपाध्यक्ष कॅप्टन राजाभाऊ आठवले, कंपनी कमांडर प्रतिभा रंजित वाघमारे, गेवराई तालुका अध्यक्ष अनिल बोराडे आणि तालुका सरचिटणीस सुभाष बांगर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अमरसिंह ढाका प्रमुख मार्गदर्शक व कॅप्टन राजाभाऊ आठवले मुख्य प्रशिक्षक तर कंपनी कमांडर प्रतिभाताई रंजीत वाघमारे, कंपनी कमांडर सुजाता प्रशांत वासनिक प्रशिक्षक म्हणून आहेत.
बीड पश्चिम चे जील्हाध्यक्ष महालिंग निकाळजे व महिला जील्हाध्यक्षा अरुणाताई निसर्गंध
या शिबिराचे नियोजन पश्चिम बीडचे जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे, सरचिटणीस सिद्धार्थ जगझाप आणि कोषाध्यक्ष अमरसिंह ढाका यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment