महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी बालाजी जगतकर यांची निवड
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी बालाजी जगतकर यांची निवड
लोकशाही पद्धतीने झालेल्या मतदानात सर्वाधिक मते; नियुक्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार
बीड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात जिल्हानिहाय कार्यकारिणी स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, त्याचाच एक भाग म्हणून बीड जिल्हाध्यक्षपदासाठी झालेल्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत बालाजी जगतकर यांनी सर्वाधिक मते मिळवत बाजी मारली. त्यांची महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया बीड जिल्हाध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली.
बीड शहरातील हॉटेल अन्विता येथे आयोजित विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ नेते वैभव स्वामी आणि आशा शेख यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. उपस्थित सदस्यांनी लोकशाही पद्धतीने मतदान केले. या मतदानात बालाजी जगतकर यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड निश्चित करण्यात आली.
निवड जाहीर झाल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष समीर देसाई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बालाजी जगतकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डिजिटल माध्यम क्षेत्राचा विस्तार, पत्रकार व डिजिटल मीडिया प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच जिल्ह्यात डिजिटल मीडिया संघटनेचे संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याची जबाबदारी आता बालाजी जगतकर यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार आहे.
या निवड प्रक्रियेस महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचे विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, सदस्य व डिजिटल मीडिया क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगतकर यांच्या निवडीबद्दल डिजिटल मीडिया क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment