सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात जुन्या डांबरी मटेरियल व दगड-गोट्यांचा वापर? सीताई कन्स्ट्रक्शनच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी-प्रा.सनी विष्णू वाघमारे

सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात जुन्या डांबरी मटेरियल व दगड-गोट्यांचा वापर? सीताई कन्स्ट्रक्शनच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी-प्रा.सनी विष्णू वाघमारे
बीड प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा स्टेडियम ते राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान सदर रस्त्याच्या बेसच्या कामामध्ये दगड-गोटे तसेच जुन्या डांबरी रस्त्याचे मटेरियल/तुकडे वापरलेले दिसून आले. त्यामुळे हे साहित्य सदर कामाच्या मंजूर अंदाजपत्रक व तांत्रिक specifications नुसार आहे किंवा नाही, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

या प्रकरणी बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी, बीड यांच्याकडे लेखी तक्रार निवेदन देण्यात आले आहे. सदर कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता तसेच मंजूर Technical Specification नुसार काम होत आहे किंवा नाही, याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“सार्वजनिक निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामामध्ये वापरलेले साहित्य आणि कामाचा दर्जा मंजूर निकषांनुसार आहे किंवा नाही, हे प्रशासनाने तपासून वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.

तपासणीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी जिल्हाधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी