पाथर्डीत हॉटेल व्यावसायिक तरुणाचा दुर्दैवी अंत; इंदिरानगरमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पाथर्डी : शहरातील इंदिरानगर परिसरात हॉटेल व्यावसायिक गणेश आंतरकर या तरुणाचा मृतदेह आज दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

गणेश आंतरकर हे पाथर्डी शहरात हॉटेल व्यवसाय करत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे आंतरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी