महामानव अभिवादन ग्रुप तर्फे कंकालेश्वर विद्यालयात 116 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

महामानव अभिवादन ग्रुप तर्फे कंकालेश्वर विद्यालयात 116 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी 
 बीड (प्रतिनिधी)
आपल्य देशात हजारो वर्षा पुसन येथील समाज व्यवस्थेमुळे बहुसंख्य दीन, दलित, वंचित, बहुजन समज शिक्षणापासून दूर होता.शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे हे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, थोर समाज धोंडो केशव कर्वे,कर्मवीर भाऊराव पाटील,ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळख असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले होते कि शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व घटकांकरिता शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील अंधार नष्ट करण्याकरिता बहुमोल परिश्रम घेतले. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून " कमवा व शिका" स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, सर्वांचा विकास हेच आमचे ध्येय हा उदात्त हेतू ठेवून गोरगरीब वंचित बहुजन करिता प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाचे रोपेट लावले व त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ,डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, शेतीतज्ञ, समाजसेवक व राजनीज्ञ निर्माण झाले आहेत तेव्हा बाल मित्रांनो " मी रयत शिक्षण संस्थेचा प्राथमिक, माध्यमिक किंवा महाविद्यालयात शिकलो व स्वहिता बरोबरच समाजाचे काही देने लागतो या भावनेतून मोठेपणी कार्य करीत आहे. असे अभिमानाने सांगता आले पाहिजे तसेच पालकांच्या कष्टाची जान ठेवून आदर्श महा पुरुषांच्या जीवनाचा अभ्यास चिंतन मनन व तसे आचरण करणे आणि गुरुजनांच्या शिस्तबद्ध प्रत्येक प्रदीर्घ ज्ञानदानाच्या अनुभवाचा फायदा घेऊन एक सुसंस्कारित स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मैत्री व करुणेचा स्वीकार करून जीवनात यशस्वी नागरिक व्हा असा मोलाचा संदेश मराठवाडा साथीचे जिल्हा प्रतिनिधी संदीप बेद्रे यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना प्रतिपादन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 139 वी जयंती चे औचित्य साधून महामानव अभिवादन ग्रुप बीड तर्फे रयत शिक्षण संस्थेचे कंकालेश्वर विद्यालयात 116 विद्यार्थ्यांना वही पेन वाटप कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक आव्हाड सर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रादेशिक संपर्कप्रमुख वैभव स्वामी, प्रभातकार विद्यालयाचे मुख्याध्यापक अमरसिंह परदेशी लाभले होते तर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे, कॅप्टन राजाभाऊ आठवले, बी.जी. दळवी, यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीएम राऊत यांनी तर प्रस्ताविक जी.एम. भोले यांनी केले.त्यानी प्रास्ताविकात महामानव अभिवादन ग्रुप राबवीत असलेल्या विविध समाज उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस व सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन घेतले. वैभव स्वामी विद्यार्थ्यांशी हितगुज संघताना मोलाचा संदेश देताना म्हणाले की महापुरुषांचे जयंती दिन स्मृतिदिन का साजरे करावे लागतात कारण त्यांच्या विचाराचा जागर सतत तरुण पिढी सोबत राहावा व त्यातून त्यांच्या आदर्श जीवनपटानुसार आपले वर्तन असावे हे किती महत्त्वाचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले आपण जेथे लहानाचे मोठे झालो शिक्षणामुळे जबाबदार नागरिक बनलो व स्वहिता बरोबर जीवन जगत त्यातूनच समाजाचे रूनफेण्या याकरिता दानपाररीमतेचे पालन करणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगितले. विद्यालयाच्या शिक्षिका शहाणे मॅडम यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महान शैक्षणिक कार्याबद्दल त्यांनी घेतलेल्या कष्टाचा जीवनपट विद्यार्थ्यां समोर उभा केला. याप्रसंगी कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या व प्रश्न उत्तर स्वरूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रत्येकाच्या जीवनातील बालपण, तरुण,पन, म्हातारपण या अवस्थेत काय कमवायचे काय पाळावयाचे याचे सुस्पष्ट चित्र उभे करताना सांगितले की प्रत्येकाने बालपणी आई वडील, गुरुजन,वडीलधाऱ्याची आदन्या पाळायची व शिक्षणातून ज्ञान मिळवायचे तरुणपनी शिल पाळायचे व धन कमवायचे म्हातारपणी शांती पाळायची व सुख समाधान मिळवायचे.ह्या गोष्टीपासून आपल्या जीवनात जी व्यक्ती दूर जाईल त्याच्या जीवनात दुःखाची हे नक्की समजावे हे अनेक उदरद्वारे समजावून सांगितले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी.जी. वानखेडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमास मुख्याध्यापक गोल्हार सर यांचे मोलाचे मार्ग सर्व सहकार्य शाळेतील सर्व शिक्षक पतंगे, जाधव, खेडकर, मोराळे, चव्हान, साळुंखे व खेडकर मॅडम, शिक्षक वृद कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. अल्पोपहार वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी