चौसाळा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी
(बीड प्रतिनिधी )बीड तालुक्यातील चौसाळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमतः कुळवाडी भुषण राजाधिराज छञपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते पप्पू पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर ढोकणे, ग्रामपंचायत सदस्य सुरज सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कोंडीराम जोगदंड, चौसाळा पञकार संघाचे अध्यक्ष विवेक कुचेकर,शिवाजी जोगदंड, संभाजी जोगदंड, लखन जोगदंड, दादाराव ढोकणे,इसाक सय्यद, महेश पवार, आप्पा नाईकवाडे इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment