बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तिव्र निषेध: ॲड. सदानंद वाघमारे

बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तिव्र निषेध: ॲड. सदानंद वाघमारे.

आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी.
बीड जिल्हा वकील संघ उद्या कामबंद ठेवणार.
बीड | प्रतिनिधी

बीड जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात वकील बंधू ॲड.राम डोंगरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला व मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत बीड जिल्हा वकील संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वकील संघात संतापाची लाट उसळली असून आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी व कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, वकील बंधू तसेच महिला वकील भगिनी यांनी एकत्र येत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन सादर केले. न्यायालयीन परिसरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत गंभीर असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वकील संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, जो पर्यंत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जात नाही. तो पर्यंत हा लढा सुरू राहील. तसेच उद्या दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी बीड जिल्हा वकील संघातील सर्व सदस्य कामकाजात सहभागी होणार नसून कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी