प्रसिद्ध ढोलकी वादक नितीन प्रधान यांना सर्वोत्कृष्ट कलावंत पुरस्कार जाहीर
बीड प्रतिनिधी : रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा 'सर्वोत्कृष्ट कलावंत' पुरस्कार नामांकित ढोलकी वादक नितीन प्रधान यांना जाहीर झाला आहे. त्यांनी आजवर कलेच्या क्षेत्रात केलेली प्रदीर्घ सेवा आणि ढोलकी वादनातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येत आहे.
या निवडीबद्दल कलाक्षेत्रातून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बीड येथे देण्यात येणार आहे,
रयत सामाजिक प्रतिष्ठान आणि समस्त कलावंतांच्या वतीने नितीन प्रधान यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे. शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment