बीडमध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचा उत्साह; भव्य रॅलीने शहरात स्वागत


​बीड प्रतिनिधी : दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे आज बीड शहरात आगमन झाले. या निमित्ताने आयोजित भव्य पादुका दर्शन सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले असून, सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून भव्य रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये हजारो निष्ठावान भक्त आणि भाविक सहभागी झाले होते. रॅलीचा मार्ग जालना रोड श्री संत सेवालाल महाराज चौक' मार्गे 'कॅनॉल रोड' असा निश्चित करण्यात आला.
  बीड शहर आणि परिसरातील हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग नोंदवला.
 'जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज की जय' च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
​पादुका दर्शनासाठी प्रशासनाकडून आणि आयोजकांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून, दिवसभर दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी