बीड शहरातील सैनिकी विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

बीड शहरातील सैनिकी विद्यालयामध्ये इयत्ता सहावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रवेश माहिती पुस्तिकेचे विमोचन; पालकांनी अर्ज करण्याचे आवाहन
बीड (प्रतिनिधी)
दि.२५ : तालुक्यातील नवगण शिक्षण संस्था संचलित सैनिकी विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी इयत्ता ६ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे. यानिमित्त प्रवेश माहिती पुस्तिकेचे विमोचन नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्था प्रशासकीय अधिकारी डॉ.व्ही.टी.देशमाने, डॉ.सुधाकर गुट्टे, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य सचिन पवार, उपप्राचार्य रविंद्र झोडगे, राजकुमार ससाणे, गणेश निर्मळ, शिवाजी सोनवणे व मेघराज कोल्हे उपस्थित होते. इयत्ता ६ वीसाठी खुली तुकडी ४५ व आदिवासी तुकडी ४५ अशा एकूण ९० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश पूर्व निवड प्रक्रिया इयत्ता ५ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेद्वारे होणार असून पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल. इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहतील. प्रवेश अर्ज १० फेब्रुवारी २०२६ ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत सैनिकी विद्यालय, बीड येथे सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत उपलब्ध राहतील. प्रवेश परीक्षा रविवार, दि.१२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सैनिकी विद्यालय, बीड येथे घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल सोमवार दि.२० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यालयाच्या नोटीस बोर्डवर जाहीर केला जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा, फिटनेस चाचणी व वैद्यकीय तपासणी दि.२३ व २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य सचिन पवार यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी