बहिरवाडी जिल्हा परिषद सर्कलमधून सदस्य म्हणून निवडणूक लढवण्याची विजय गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी कडे मागणी
बीड ( प्रतिनिधी ) बहिरवाडी जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तालुकाध्यक्ष तथा निरीक्षक मनोज पाटील तसेच नगरसेवक राहुल गुरखुदे मागणी केली. जनप्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तसेच स्थानी 1996 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्राथमिक सदस्यता तसेच विविध उपक्रमांतर्गत नागरिकांना शासनाच्या योजना असतील शासकीय रुग्णालयातील गोरगरिबांच्या अडचणी असतील तसेच सामान्य नागरिकांची प्रश्न असतील ते सोडवण्याचे काम केले असल्याने आपण या बहिरवाडी सर्कल मध्ये अनेक उत्तम काम सामान्य नागरिकांसाठी करण्याच्या उदात्त हेतूने आपण ही निवडणूक लढत असल्याचे यावेळी विजय गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळवली आहे.अशी मागणी सामान्य जनतेतून मागणी होत असून आपणही ही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
Comments
Post a Comment