वडमारे नावाच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध नवनाथ अण्णा शिराळे माजी सभापती .
बीड प्रतिनिधी
बीड शहरातील पेठ बीड भागामध्ये नगर परिषदेचे एका दीनदुबळ्या कर्मचाऱ्यान झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध करत असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकामध्ये बीड नगर परिषदेचे माजी सभापती तथा भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी म्हटले आहे सध्या बीड शहरांमध्ये सर्वत्र नगर प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव व स्वच्छता मोहीम चालू आहे याच पार्श्वभूमीवर बीड शहरातील पेठ बीड भागामध्ये नगर परिषदेचे काही कर्मचारी चार ते पाच साफसफाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणच्या गाव गुंडांनी त्यांना मारहाण केली या या मार हाणीचा नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे या गाव गुंडांनी या दीन दुबळ्या गरीब वडमारे नावाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून नेमका कुठला पुरुषार्थ साध्य केला आहे त्यांना जर नगरपालिकेच्या विषयी कुठला जर राग असेल तर त्यांनी नगर परिषदेच्या समोर आंदोलन करावे मोर्चा काढावे लोकशाही मार्गाने त्यांनी लढावे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटावे नगर प्रशासनाच्या विरोधात त्यांनी मोठे आंदोलन उभा करावे परंतु असे गोर गरीब दिन दुबळ्या कर्मचाऱ्याला मारहाण करून नेमका कुठला पुरुषार्थ त्यांना साध्य करायचा आहे हेच कळेनासे झाले आहे म्हणून या मार हनीचा नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे.
Comments
Post a Comment