मौजे धानोरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन



मौजे धानोरा येथे अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन

   ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता
   आष्टी / बीड ( प्रतिनिधी -- गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आज दिनांक २० ऑक्टोबर २०२२ गुरुवार ते २७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये वैकुंठवाशी ह.भ.प. बाळू देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरु तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून , दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा ,पारायण, गाथा, भजन, हरिपाठ व हरी किर्तन आयोजित करण्यात आले असून ,या सात दिवस चालणाऱ्या सप्ताह मध्ये ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज तांबे ,ह. भ. प. पांडुरंग महाराज उगले ,ह. भ. प. गणेश महाराज वारंगे ,ह. भ. प. माऊली महाराज कोठुळे ,ह. भ. प. दिनेश महाराज माने ,ह. भ. प. आरती ताई शिंदे ,ह. भ. प. बाबासाहेब महाराज रांजळे कीर्तनकार असून दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ गुरुवार रोजी सकाळी ह. भ. प. इंदुरीकर महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असून ,ह. भ. प. इंदुरीकर महाराज देशमुख यांच्या कीर्तनाची सेवा- रावसाहेब प्रल्हाद वाघमारे ( साहेब ) यांच्यामार्फत असून महाप्रसादाची पंगत श्री. नारायण आबाराव शेळके ( आप्पा ) यांची असून तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी ,व माता भगिनींनी अखंड हरिनाम सप्ताह व काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी , ग्रामस्थ व भजनी मंडळ धानोरा यांनी केले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी