Posts

वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व असंख्य कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा

Image
   गेवराई प्रतिनिधी दि.२३ रोजी तालुक्यातील खळेगाव येथे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोकळे तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पू) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खळेगाव येथे मोठ्या उत्साहात वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रिपाइं (आ), राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प), भाजपा या पक्षांना सोडचिठ्ठी देत असंख्य कार्यकर्त्यांनी अँड मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पू)गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीला आपल्यातीलच काही काँग्रेसची हरिजनांनी पैसे घेऊन वंचित बहुजन आघाडी बद्दल अपप्रचार केले त्यामुळे 2019 ला 42 लाख मते घेणारा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अर्ध्या मातावर आला होता. आपण आता सावध राहिले पाहिजे भविष्यात भाजप आणि महायुती सरकार आंबेडकरवादी आणि दलित समूहावर अनेक अन्यायकारक कायदे लागू करू मानसिकतेत आहे ,त्यामुळे आपण संघटित राहणे गरजेचे आहे. एड. बाळासा...

पारगाव जिल्हा परिषद गटात “लाडक्या बहिण योजनेची मोफत KYC”चा माता भगिनींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा — दीपक दादा घुमरे

Image
पाटोदा (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने पाटोदा तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटात “लाडक्या बहिण योजनेची मोफत KYC मोहीम” राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश शासनाच्या महिला कल्याण योजनांचा लाभ प्रत्येक पात्र भगिनीपर्यंत पोहोचवणे व महिलांना प्रशासनाशी जोडून त्यांचे सक्षमीकरण करणे हा आहे.या मोहिमेबाबत माहिती देताना दीपक दादा घुमरे म्हणाले,महिलांसाठी राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे, पण अनेक भगिनींची KYC अपूर्ण असल्याने त्या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या माध्यमातून पारगाव गटात ही मोहीम हाती घेतली असून, सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करत आहोत.या उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रशिक्षित स्वयंसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते महिलां भगिनींना KYC पूर्ण करण्यास मदत करतील.दीपक दादा घुमरे पुढे म्हणाले की, “लाडक्या बहिण योजना ही महिला...

भक्तीचा तेज-सेवाभावाची ओळख,ह.भ.प.राजु महाराज लोखंडे /पत्रकार अण्णासाहेब साबळे यांचा मच्छिंद्रनाथ देवस्थानात गौरवपूर्ण सत्कार

Image
आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :            आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पवित्र नगरीत भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला असून मच्छिंद्रनाथ देवस्थान दर्शनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध ह.भ.प.राजु महाराज लोखंडे आणि प्रामाणिक व जनतेच्या समस्यांना आवाज देणारे पत्रकार अण्णासाहेब साबळे यांचा देवस्थान ट्रस्टतर्फे गलब व श्रीफळ देऊन मानाचा सत्कार करण्यात आला.    या सोहळ्यात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे आणि सचिव बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी समाजसेवक बबनराव शिंदे,पोपट जाधव यांच्यासह अनेक भक्तजन उपस्थित होते.    सत्कारावेळी उपस्थितांनी राजु महाराज लोखंडे यांच्या सहवासातून लाभलेल्या अध्यात्मिक अनुभवांचा, तसेच ५० वर्षांपूर्वी व ५० वर्षांनंतरही अचूक भाकीत सांगणाऱ्या त्यांच्या तर्कशक्तीचा गौरव करण्यात आला असून पत्रकार अण्णासाहेब साबळे यांच्या सामाजिक बांधिलकी, निःस्वार्थ पत्रकारिता आणि लोकहितासाठीच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले....

मनाच्या शुद्धतेनेच माणूस शीलवंत आणि सदाचारी होतो- पूज्य भंते धम्मशील थेरो

Image
 सम्यक संबुद्ध विहार नागोबा गल्ली येथे वर्षावास समापन धम्मदेशनेने संपन्न  बीड (प्रतिनिधी ) पूज्य डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक चंपावती नगरी बीडला लाभलेले पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या अथक प्रयत्नाने मौजे शिवनी येथे स्थापन झालेल्या प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बीड परिसरात व बीड जिल्ह्यात धम्माचे अनेक कार्यक्रम संपन्न होऊन धम्ममय वातावरण निर्माण झालेले आहे भन्ते धमशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बहुतांश विहारात वर्षावास काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म"या ग्रंथाचे वाचन नियमित 3 महिने करण्यात आले. त्यामुळे बुद्ध धम्म समजावून घेण्यास सामुदायिक गती मिळाली.धम्मग्रंथ वाचन समापन प्रसंगी अनेक विहारात पूज्य धम्मशील यांच्या धम्मदेशनेचा लाभ बहुसंख्येने उपासक उपासिका व बालक बालिकांना मिळाला. मनाच्या शुद्धतेनेच माणूस शीलवंत आणि सदाचारी होतो असे सम्यक संबुद्ध विहार नागोबा गल्ली बीड येथे पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांनी धम्मदेशने प्रसंगी प्रतिपादन केले. ह्या प्रसंगी सर्वप्रथम बीड शहरातील डॉ. बाबासाहेबांच्य...

पाटोदा तालुक्यात क्रीडा संकुल कधी होणार? नरसिंह जाधव यांचा सवाल

Image
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी अत्यंत आवश्यक असलेले क्रीडा संकुल अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. अनेक वर्षांपासून या संकुलाची चर्चा सुरू असूनही शासनस्तरावर ठोस पावले उचलली जात नसल्याने स्थानिक युवकांत नाराजी व्यक्त होत आहे.अँड. नरसिंह जाधव यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, “पाटोदा तालुक्यात दरवर्षी अनेक खेळाडू जिल्हा, राज्य, तसेच राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवत असतात. मात्र योग्य सुविधा, मैदान, जिम, प्रशिक्षण केंद्र, आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे त्यांचे स्वप्न अर्धवट राहते. शासनाने आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.”जाधव पुढे म्हणाले की, “क्रीडा संकुलासाठी जागा निश्चित करून निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. युवकांच्या उर्जेला योग्य दिशा देण्यासाठी क्रीडा विकास अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. फक्त आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम व्हावे अशी जनतेची मागणी आहे.”स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही आता एकच प्रश्न विचारला जात आहे — “पाटोदा तालुक्यातील क्रीडा संकुल कधी उभारले जाणार?”

कॉन्ट्रॅक्टर अनिल मस्के यांच्यासह मान्यवरांनी केले जगतकर कुटुंबियांचे सांत्वन

Image
परळी / प्रतिनिधी – परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार बालाजी जगतकर तसेच इंजी. राजू जगतकर यांचे वडील स्मृतिशेष श्रावणदादा जगतकर यांचे दिनांक १६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परळी शहरासह सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनमान्य कॉन्ट्रॅक्टर व समाजसेवक अनिल मस्के यांनी परळीतील कासुमाय निवासस्थानी भेट देऊन जगतकर कुटुंबीयांना सांत्वनपर दिलासा दिला. दुःखाच्या या प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांचे त्यांनी धीर देत, श्रावणदादांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहिली. या वेळी पी.आर.पी. पक्षाचे नेते सोपान ताटे, समाजसेवक सुनील गोदाम, तलाठी प्रमोद सावंत, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, राजाभाऊ जगतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे दिवंगत श्रावणदादा जगतकर यांच्या कार्याची आठवण काढत, त्यांचे जीवन समाजासाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले. श्रावणदादा जगतकर हे परळी शहरातील सर्वांसोबत प्रेमळ वर्तन, सुसंस्कारित कुटुंब आणि समाजनिष्ठ वृत्तीमुळे परिचित होते. त्यांच्या जाण्याने परळी शहराने एक प्रेमळ, सज्जन व समाजाभिमुख व्यक्तिमत्व गमाव...

आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता महाविद्यालयातील दोन मुलींनी कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले,राष्ट्रीय कुस्ती स्पर्धे साठी पुन्हा निवड

Image
धानोरा येथील जनता महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा   आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता महाविद्यालयातील दोन मुलींनी कुस्ती स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले,राष्ट्रीय कुस्ती स्पर्धे साठी पुन्हा निवड आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :               कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील जनता महाविद्यालयातील तीन कुस्तीपटू विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दोन मुलींनी कुस्ती चिटपट करत आपापल्या वजनी गटात यश प्राप्त केले असून यामध्ये सावरी सातकर आणि तुलसी पाथरे या कुस्ती खेळाडू मुलींनी सुवर्णपदक प्राप्त केले. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच पैलवान श्री. किरण मोरे सर उपस्थित होते.   या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरणासाठी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , आम...