पाटोदा तालुक्यात क्रीडा संकुल कधी होणार? नरसिंह जाधव यांचा सवाल

पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तालुक्यातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी अत्यंत आवश्यक असलेले क्रीडा संकुल अद्याप प्रत्यक्षात आलेले नाही. अनेक वर्षांपासून या संकुलाची चर्चा सुरू असूनही शासनस्तरावर ठोस पावले उचलली जात नसल्याने स्थानिक युवकांत नाराजी व्यक्त होत आहे.अँड. नरसिंह जाधव यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, “पाटोदा तालुक्यात दरवर्षी अनेक खेळाडू जिल्हा, राज्य, तसेच राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवत असतात. मात्र योग्य सुविधा, मैदान, जिम, प्रशिक्षण केंद्र, आणि मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे त्यांचे स्वप्न अर्धवट राहते. शासनाने आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.”जाधव पुढे म्हणाले की, “क्रीडा संकुलासाठी जागा निश्चित करून निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. युवकांच्या उर्जेला योग्य दिशा देण्यासाठी क्रीडा विकास अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. फक्त आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम व्हावे अशी जनतेची मागणी आहे.”स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही आता एकच प्रश्न विचारला जात आहे — “पाटोदा तालुक्यातील क्रीडा संकुल कधी उभारले जाणार?”

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी