वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व असंख्य कार्यकर्ते यांचा प्रवेश सोहळा

  

गेवराई प्रतिनिधी दि.२३ रोजी तालुक्यातील खळेगाव येथे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोकळे तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पू) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खळेगाव येथे मोठ्या उत्साहात वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रिपाइं (आ), राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प), भाजपा या पक्षांना सोडचिठ्ठी देत असंख्य कार्यकर्त्यांनी अँड मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पू)गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीला आपल्यातीलच काही काँग्रेसची हरिजनांनी पैसे घेऊन वंचित बहुजन आघाडी बद्दल अपप्रचार केले त्यामुळे 2019 ला 42 लाख मते घेणारा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अर्ध्या मातावर आला होता. आपण आता सावध राहिले पाहिजे भविष्यात भाजप आणि महायुती सरकार आंबेडकरवादी आणि दलित समूहावर अनेक अन्यायकारक कायदे लागू करू मानसिकतेत आहे ,त्यामुळे आपण संघटित राहणे गरजेचे आहे. एड. बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते आहेत की जे दलित, ओबीसी, मुस्लिम या बहुजन समूहासाठी आवाज उचलतात रस्त्यावरची लढाई लढतात वेळप्रसंगी अंगावर काळा कोट घालून न्यायालयीन लढाई देखील लढतात त्यामुळे आपण त्यांचे हात मजबुत करण्यासाठी कायम एकनिष्ठ आणि सोबत राहिले पाहिजे तसेच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद , नगरपालिका या निवडणुकात तळागाळातील कार्यकर्त्यांना यांनाच उमेदवारी देणार असून त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदिनीशी खंबीरपणे उभा राहून सभागृहात आपले वंचित बहुजनांचे प्रतीनधी पाठवणार आहे, तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष व त्याची टीम अत्यंत सक्रिय असून तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला अर्ध्या रातीला धावून जाणारे आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा आणि गाव पातळीवरील जनतेची आडलेली कामे करत चला ही जनता तुम्हाला मतरुपी आशीर्वाद देऊन एक दिवस कायद्याच्या सभागृहात पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मत अजय सरवदे यांनी शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. 
 यावेळी जिल्हा सदस्य भीमराव चव्हाण, बीड शहराध्यक्ष लखन जोगदंड, किशोर भोले, ज्ञानेश्वर हवाले, कृष्णा हातागळे तसेच शाखा अध्यक्ष शाहू साळवे, उपाध्यक्ष दामू दारकोंडे, सल्लागार अशोक काळे, दशरथ साळवे, आसाराम साळवे,रतन खरात, राजेंद्र अक्कल साळवे, चेतन साळवे, सतीश पोटफोडे, संतोष साळवे, बाबू साळवे, नितीन साळवे, धीरज साळवे, किरण साळवे, गौतम खरात, राहुल खरात, सुमित साळवे, कैलास साळवे, आकाश खरात, अनिकेत कांबळे, कृष्णा दारकोंडे, सतीश साळवे, परमेश्वर साळवे, काळू खरात, अविनाश साळवे, भीमराव साळवे, विकास खरात, अरुण कापसे, अर्जुन साळवे ,अजय साळवे, राम साळवे, सागर साळवे, रोहित साळवे, गौतम साळवे, किशोर पोटफोडे ,निलेश साळवे तसेच फळे गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी