कॉन्ट्रॅक्टर अनिल मस्के यांच्यासह मान्यवरांनी केले जगतकर कुटुंबियांचे सांत्वन


परळी / प्रतिनिधी
परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार बालाजी जगतकर तसेच इंजी. राजू जगतकर यांचे वडील स्मृतिशेष श्रावणदादा जगतकर यांचे दिनांक १६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परळी शहरासह सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शासनमान्य कॉन्ट्रॅक्टर व समाजसेवक अनिल मस्के यांनी परळीतील कासुमाय निवासस्थानी भेट देऊन जगतकर कुटुंबीयांना सांत्वनपर दिलासा दिला. दुःखाच्या या प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांचे त्यांनी धीर देत, श्रावणदादांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहिली.

या वेळी पी.आर.पी. पक्षाचे नेते सोपान ताटे, समाजसेवक सुनील गोदाम, तलाठी प्रमोद सावंत, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, राजाभाऊ जगतकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे दिवंगत श्रावणदादा जगतकर यांच्या कार्याची आठवण काढत, त्यांचे जीवन समाजासाठी आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले.

श्रावणदादा जगतकर हे परळी शहरातील सर्वांसोबत प्रेमळ वर्तन, सुसंस्कारित कुटुंब आणि समाजनिष्ठ वृत्तीमुळे परिचित होते. त्यांच्या जाण्याने परळी शहराने एक प्रेमळ, सज्जन व समाजाभिमुख व्यक्तिमत्व गमावले आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या प्रसंगी परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, पत्रकार बांधव आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून जगतकर परिवाराला आपली सहवेदना व्यक्त केली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी